Skip to content

Deola | खर्डेत बनी इंग्लिश मिडीयम स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  खर्डे (ता. देवळा) येथील हनी बनी इंग्लिश मिडीयम स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास प्रमुख आकर्षण म्हणून सिने अभिनेत्री नेहा सोनवणे उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवव्याख्याते यशवंत गोसावी, स्वप्नील ऍग्रोचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, बाजार समितीचे माजी सभापती बापू देवरे, एसबीआयचे शाखा व्यवस्थापक कैलास गायधनी, मॉडेल अँकर तोसिफ सय्यद उपस्थित होते. प्रास्ताविक स्कुलचे, संचालक किरण जाधव यांनी केले. यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्रमुख पाहुण्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.(Deola)

Deola | देवळा येथे महाशिवरात्री निमित्ताने भाविकांना प्रसाद, आणि महिलांना पर्स वाटप 

स्नेह संमेलन यशस्वी तेसाठी ,प्राचार्या वैशाली जाधव,शिक्षक निशा केदारे, संध्या देवरे, पूजा चव्हाण, अनिता निरभवणे, कावेरी सावंत , प्रियांका जाधव, पल्लवी पवार, धनश्री जगताप, मानसी जाधव,भूवनेश्र्वरी दिक्षित., संदीप खरे, देविदास कुवर, निलेश सोनवणे, सिमा जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, कृषी पर्यटन केंद्राचे बाळासाहेब देवरे, वसंत जाधव, सुरेश जाधव, यशवंत देवरे, हर्षद मोरे, राहुल देवरे, उपसरपंच सुनील जाधव, संदीप पवार, मधुकर देवरे आदींसह पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Deola)

Deola | देवळा नगरपंचायतीच्या नवीन इमारतीसाठी १० कोटींचा निधी मंजूर


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!