Pune News | दर्गा की पुण्येश्वर महादेव मंदिर..?; दर्ग्याच्या अतिक्रमणावरून तणाव

0
3
Pune News
Pune News

Pune News | राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातून एक मोठी आत्मी समोर आली आहे. पुणे शहरात मध्यरात्रीपासून तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तर, ही परिस्थिती एका अफवेमुळे ओढावली आहे. दरम्यान, यामुळे पोलिसांच्या सुट्ट्या देखील रद्द झाल्या असून, परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पुण्यातील कसबा पेठ परिसरात असणाऱ्या सलाउद्दीन दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार असल्याची अफवा पसरल्यामुळे संपूर्ण शहरात मध्यरात्रीपासूनच तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नागरिकांना कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच ही अफवा पसरवणाऱ्यांचा तपास सुरु केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (Pune News)

Pune News | नेमकं प्रकरण काय..?

दरम्यान, पुणे शहरातील कसबा पेठ परिसरातील शेख सल्लाह दर्गा येथे अनधिकृतरित्या बांधण्यात आलेल्या अतिक्रमणावर करवाई करण्यात येणार असल्याची अफवा शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास पसरली होती. त्यामुळे या ठिकाणी मुस्लीम समाजाचा मोठा जमाव जमला होता. ही अफवा पासरल्यानंतर येथील परिसरात काही काळ तणावाचे वाटवर्ण निर्माण झाले होते. या जागेवरून आधीच वाद असून, याठिकाणी मशिद नाहीतर पुण्येश्वर महादेवाचे मंदिर असल्याचा दावा हिंदू संघटनांकडून केला जात आहे. तर, येथे मशिदच असल्याचा दावा मुस्लिम समाजाकडून केला जात आहे. यातच ही अफवा पसरल्यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता. मात्र यावेळी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.(Pune News)

Pune News | काय सांगता..! ६१ लाखांची मटणाची उधारी

मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक

तर, या प्रकरणी आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे येथील मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक घेणार असून, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाशी अमितेश कुमार हे सविस्तर चर्चा करणार असल्याची माहिती आहे. तसेच पोलिसांकडून ही अफवा कोणी पसरवली याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, पोलिस कारवाई करत असून, पोलीस आयुक्तांनी नागरिकांना शांततेचे आणि कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. (Pune News)

तातडीने सुट्ट्या रद्द 

काल मध्यरात्री अचानक ओढवलेल्या या प्रसंगामुळे पुणे पोलीस दलातील सर्व पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या ह्या तातडीने रद्द करण्यात आल्या असून, पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सुट्ट्या रद्द करण्याबाबतचे आदेश काढले आहेत. आज आणि उद्या असलेल्या शहरातील सर्व पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या या तातडीने रद्द करण्यात आल्या. तसेच या घटनेमुळे या संपूर्ण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.(Pune News)

Pune News | बॉसने Whatsapp ग्रुपमधून काढलं; कर्मचाऱ्याने त्याला बांबूने झोडपलं

दर्ग्याच्या जागेवर पुण्येश्वर महादेव मंदिर..?

तसेच पुणे पोलीस दलातील सर्व बडे पोलीस अधिकारी हे पुण्येश्वर मंदिर परिसरात तैनात असून, पुण्याचे सहपोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त हे येथील संपूर्ण परिसराचा आढावा घेत आहेत. तर, या दर्ग्याच्या जागेवर पुण्येश्वर महादेवाचे मंदिर असल्याचा दावा हा अनेक हिंदू संघटनांकडून अनेक वर्षांपासून केला जात आहे. पण येथे मशिदच असल्याचा दावा हा येथील मुस्लिम समाजाकडून केला जात आहे. दरम्यान, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.(Pune News)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here