MNS Vardhapan Din | नाशकात ‘राज गर्जना’; मला माझ्या खांद्यावर माझीच पोरं खेळवायची

0
2
MNS Vardhapan Din
MNS Vardhapan Din

MNS Vardhapan Din | आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापन दिन हा नाशिकमध्ये पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी राज ठाकरे हे सहकुटुंब परवा संध्याकाळी नाशिकमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर काल त्यांनी पंचवटीत काळाराम मंदिरात आरती केली. तर, अमित ठाकरे यांनी सपत्नीक काळाराम मंदिरात विधीवत पूजा केली. दरम्यान, आज नाशिकमधून राज ठाकरे कोणावर तोफ डागणार? याची मोठी उत्सुकता होती.

तसेच गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजपच्या नेत्यांच्या सुरू असलेल्या भेटींमुळे मनसेदेखील आता सत्तेत सहभागी होणार का ? याबाबत चर्चा सुरू होत्या. याबाबत राज ठाकरे काही मोठी घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. अखेर ही उत्सुकता संपली असून, नाशिकमध्ये ‘राज गर्जना’ झाली असून, राज ठाकरेंनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. (MNS Vardhapan Din)

MNS Vardhapan Din | राज ठाकरेंचे शिलेदार नाशिकमध्ये कडाडले

वडा टाकला की लगेच तळून आला पाहिजे.

दरम्यान, यावेळी राज ठाकरे म्हणाले की, “सोशल मीडियाचा योग्य वापर करायला हवा. सध्या सोशल मीडियावर माझ्या बाबतीत काहीही दाखवतात. ज्यात गाडी येते मी उतरतो आणि मागे ‘आ रा रा रा’ हे असं काहीतरी गाणं लावतात. पक्ष म्हटले की लोक सोशल मीडियावर बघत नाही. सोशल मिडियाच्या माहितीसाठी केतन जोशी यांची व्याख्याने प्रत्येक जिल्हा तालुका स्तरावर ठेवणार. मनसेला आज १८ वर्ष पूर्ण होत आहे. राज्यातील प्रत्येक प्रमुख शहरात वर्धापन दिन साजरा केला जाणार. मात्र यानिमित्ताने आज राजकीय इतिहास सांगणे गरजेचे आहे. कारण आजकाल प्रत्येकाला वडा टाकला की लगेच तळून आला पाहिजे.(MNS Vardhapan Din)

मला माझ्या खांद्यावर माझीच पोरं खेळवायची

राज ठाकरेंची तोफ नाशिकमध्ये कडाडली असून, यावेळी ते म्हणाले की,” गेल्या १८ वर्षात माझे भाग्य समजतो की, मी अनेक चढ उतार बघितलेत. यात चढ कमी आणि उतारच जास्त पण यातही तुम्ही माझ्या सोबत राहिलात. पण विश्वास ठेवा आपल्याला यश नक्की मिळणार. मी ते तुम्हाला मिळवून देणार पण फक्त तुम्ही पेशन्स ठेवला पाहिजे. कारण मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायचीय. सध्या राज्यात लोकं दुसऱ्याची पोरं खेळवतात. पण माझ्या खांद्यावर माझी पोरं खेळवण्याची ताकद माझ्यात आहे.  (MNS Vardhapan Din)

Raj Thackeray | काळारामाचं दर्शन घेऊन मनसे फुंकणार लोकसभेचे रणशिंग

MNS Vardhapan Din | राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नाही 

यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर तोफ डागली असून, राज ठाकरे म्हणाले की,”राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नाही. तर, फक्त निवडून येणाऱ्या माणसांची मोळी आहे. शरद पवार हे नेहमी हेच करत आलेय. मात्र, ते पक्षातून वेगळे झाले तरी निवडून येणार आहेत. या महाराष्ट्रात जर कुठले पक्ष स्थापन झाले असतील तर ते केवळ तीनच आहेत. जनसंघ, शिवसेना आणि मनसे.(MNS Vardhapan Din)

मनसे जे सुरू करते त्याचा शेवट ही करते 

गेल्या अनेक वर्षांपासून अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक करू असे आश्वासनं दिली जात आहेत. मग स्मारक अजून का नाही झाले?. पंतप्रधान आले आणि तिथे फुलं वाहून गेले, मग काय झालं त्या फुलांचं. तेवढ्यात तिकडे वल्लभभाई पटेलांचा पुतळाही उभा राहिला. मनसे हे सुरू करते तसा त्याचा शेवटही करते. आमची भूमिका ही नेहमी स्वच्छ आणि प्रामाणिक होती आहे. आम्ही अनेक यशस्वी आंदोलनं केलीत. प्रार्थना स्थळावरील भोंगे काढले, समुद्रात दर्गा बांधत होते. रात्रीटुन्न पडायला लावली, असं म्हणत राज ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here