MNS Vardhapan Din | राज ठाकरेंचे शिलेदार नाशिकमध्ये कडाडले

0
3
MNS Vardhapan Din
MNS Vardhapan Din

MNS Vardhapan Din | आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापन दिन हा नाशिकमध्ये पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी राज ठाकरे हे सहकुटुंब परवा संध्याकाळी नाशिकमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर काल त्यांनी पंचवटीत काळाराम मंदिरात आरती केली. तर, अमित ठाकरे यांनी सपत्नीक काळाराम मंदिरात विधीवत पूजा केली. दरम्यान, आज नाशिकमधून राज ठाकरे कोणावर तोफ डागणार? याची मोठी उत्सुकता होती.(MNS Vardhapan Din)

अखेर या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजपच्या नेत्यांच्या सुरू असलेल्या भेटींमुळे मनसेदेखील आता सत्तेत सहभागी होणार का ? याबाबत चर्चा होती. मनसे आणि भाजपच्या नेत्यांनीही सूचक वक्तव्य केले होते. दरम्यान, राज ठाकरेंच्या शिलेदारांनी अनेक मुद्द्यांना हात घातला असून, बाळा नांदगावकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.(MNS Vardhapan Din)

Raj Thackeray | काळारामाचं दर्शन घेऊन मनसे फुंकणार लोकसभेचे रणशिंग

MNS Vardhapan Din | काय म्हणाले बाळा नांदगावकर..?

यावेळी बाळा नांदगावकर म्हणाले की, गेल्या १८ वर्षांपासून आपला हा प्रवास आनंदाने सुरू आहे. तर पुढील प्रवासही असाच आनंदाने आणि जल्लोषाने करायचा आहे. आजपर्यंतचा हा प्रवास खाच खळग्यांनी भरलेला होता. अनेक चढ उतार आणि यश अपयश बघितल्यानंतरही आपली ही निष्ठा कायम आहे. त्यामुळे तुमच्या निष्ठेला नमस्कार.

या अंजपर्यंतच्या प्रवासात आपण अनेक आंदोलनं केले. अनेक ‘जेल भरो’ आंदोलनं केले. अनेकवेळा पोलिसांचा मार खाल्ला तरीही आपण येथे आहात. कोकणातील रस्त्यांसाठी पदयात्रा काढली, तर आता तो रस्ता होतोय हे आपले यश आहे. पुण्यातदेखील आपण नुकताच मोर्चा काढला एवढा मोठा मोर्चा कोणीही काढला नव्हता. आपलं भोंगे आंदोलन देखील यशस्वी झाले. अनेक लोकांना यामुळे त्रास होत होता. केवळ महाराष्ट्र नाहीतर आपल्या भोंग्याचा आवाज हा उत्तर प्रदेशपर्यंत पोहचला. पण इथल्या सरकारने याबाबत काही प्रयत्न केले नाही. (MNS Vardhapan Din)

Shantigiri Maharaj | शांतीगिरी महाराज नाशिकमधून लढवणार लोकसभा निवडणुक..?

आपल्याकडे एक हुकमी एक्का 

आपल्याकडे एक हुकमी एक्का आहे. आपण जर ठरवलं तर आपण आता काहीही करून दाखवू शकतो. फक्त यासाठी तुमची साथ हवी आहे. मागील ५ वर्षात राज्याचं राजकारण हे किती गढूळ झालं आहे. आता राज साहेबांशिवाय दुसरा माणूस नाही. आपण दुष्काळात देखील अनेक ठिकाणी पाणी पोहचविण्याचे काम केले आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये आपण राज्यात चमत्कार घडविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (MNS Vardhapan Din)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here