Lok Sabha Election | आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ही साधारण १४ मार्च रोजी जाहीर होऊ शकते. मात्र, अजूनही दोन्ही गोटात जागावाटपावरून अजूनही ‘तु तु मै मै’ सुरू आहे. तर, महायुतीत मात्र वाद आणखीच वाढ आहे. भाजप ३२ जागांवर अडून आहे. शिंदे गटाला १३ जागा पाहिजे. तर, जितक्या जागा शिंदे गटाला दिल्या जातील तितक्याच जागांची अजित पवार गटांचीही मागणी आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी मध्यरात्री १ वाजेपर्यंत खलबतं झाली. या बैठकीत काही निर्णय झाल्याची शक्यता आहे.(Lok Sabha Election)
Lok Sabha Election | शिंदे सेनेचे काही उमेदवार बदलले
सध्या लोकसभेच्या जागावाटपावरुन महायुतीत बिनसल्याचे दिसत आहे. रामदास कदम, छगन भुजबळ या नेत्यांनी ही नाराजी बोलूनही दाखवली. दरम्यान, कालच्या बैठकीत अमित शाह यांनी शिवसेनेचे काही उमेदवार बदलण्याच्या सूचना केल्याचीही माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे अजित पवार जागा वाढवण्यावर अडून आहेत. यावरून अमित शाह यांच्या निवासस्थानी काल मध्यरात्रीपर्यंत खलबतं सुरु होती. यानंतर अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्यासोबतही अमित शाहांनी स्वतंत्र चर्चा देखील केली होती. (Lok Sabha Election)
Lok Sabha Elections Date | आगामी लोकसभा निवडणुकांबाबत मोठी घोषणा…
शाहांच्या निवासस्थानी मध्यरात्रीपर्यंत खलबतं
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजधानी दिल्ली येथील निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची लोकसभा जागावाटपावरुन मध्यरात्री १ वाजेपर्यंत बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीच्या महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला हा निश्चित झाला असून त्याबाबतची अधिकृत घोषणा देखील लवकरच केली जणार असल्याची माहिती आहे. तर, यात शिवसेना शिंदे गटाला दोन अंकी, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक अंकी आणि बाकी जागा या भारतीय जनता पक्षाला असे गणित ठरल्याची माहिती संमोर आली आहे. (Lok Sabha Election)
Loksabha Election | केसाने गळा कापू नका; शिंदे गटाचा भाजपला इशारा
शिंदेसेना आणि अजित पवार गटाला किती जागा?
दरम्यान, कालच्या या बैठकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ तीन किंवा चार जागा तर, शिवसेना शिंदे गटाला १० ते १२ जागा मिळू शकतात. याता वायव्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, रामटेक, पालघर, हातकणंगले या जागांवर भाजप लढू शकते आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेला बारामती, शिरुर, रायगड, आणि परभणी या जागा मिळू शकतात. तर शिर्डी व यवतमाळचे उमेदवार देखील बदलले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.(Lok Sabha Election)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम