Rohit Pawar | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कर्जत जामखेडचे आणि शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी सुरू होती. याआधी दोन वेळेस त्यांची चौकशी झाली होती. दरम्यान, आता ईडीकडून रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीशी संबंधित संपत्ती जप्त करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी ईडीने ही कारवाई केली असून हा आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का आहे. आता या प्रकरणात पुढे काय होईल. हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.(Rohit Pawar)
Rohit Pawar | ठाकरेंनंतर आता शरद पवारांच्या शिलेदारांवर ‘इडी अस्त्र’..?
ईडीकडून रोहित पवारांच्या संबंधित बारामती ॲग्रो या कंपनीशी संबंधित छत्रपती संभाजी नगर मधील कन्नड येथील साखर कारखान्यातील १६१.३० एकर इतकी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यात जमीन, शुगर प्लांट, साखर कारखान्याची इमारत तसेच इतरही अनेक गोष्टींचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची कथित बारामती ॲग्रो गैरव्यवहार प्रकरणी गेल्या काही दिवसांपूर्वीच तब्बल १२ तास चौकशी झाली होती. यानंतर देखील रोहित पवारांना पुढील तारीख देण्यात आली होती. आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती ॲग्रो या कंपनीत गैरव्यवहार झाल्या प्रकरणी त्यांची ही ईडीकडून चौकशी सुरू आहे.(Rohit Pawar)
Rohit Pawar | नेमकं प्रकरण काय..?
छत्रपती संभाजी नगर येथील कन्नड सहकारी साखर कारखाना आजारी झाल्यावर त्याचा राज्य सहकारी बँकेने लिलाव केला होता. दरम्यान, हा कारखाना तब्बल ५० कोटी इतक्या किंमतीत रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीने खरेदी केला असून, या खरेदी प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा ठपका इडिने ठेवला असून, याच प्रकरणी ईडीने बारामती ॲग्रो कंपनीची आणि रोहित पवार यांची चौकशी केली. या लिलाव प्रक्रियेतील कंपन्यांचे एकमेकांतील व्यवहार हे संशयास्पद असल्याचे देखील आरोप ईडीकडून करण्यात आला आहे.(Rohit Pawar)
Rohit Pawar | ‘पळणारे नाही, लढणारे दादा’; रोहित पवारांची नेमकी चौकशी का..?
बारामती ॲग्रो, हायटेक इंजिनिअरिंग, समृद्धी शुगर या कंपन्या देखील या लिलावात सहभागी आहेत. या हायटेक कंपनीने लिलावासाठी पाच कोटी रूपयांची देखील रक्कम जमा केली होती. ही रक्कम बारामती ॲग्रो या कंपनीकडून घेतल्याचे सांगितले जात आहे. विविध बँकांमधून खेळत्या भांडवलासाठी घेतलेली रक्कम ही बारामती ॲग्रोने हा संबंधित कारखान्याच्या खरेदीसाठी वापरल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. (Rohit Pawar)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम