Skip to content

Deola | देवळा नगरपंचायतीच्या नवीन इमारतीसाठी १० कोटींचा निधी मंजूर

Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  आमदार डॉ राहुल आहेर, आणि भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून देवळा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी १० कोटी रूपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्षा भाग्यश्री पवार यांनी दिली. तत्कालीन देवळा ग्रामपालिकेचे सन २०१५ मध्ये देवळा नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले असून, ह्या कार्यालयासाठी जागा कमी पडत असल्याने नवीन प्रशासकीय इमार व त्यासाठी निधी मंजुरीसाठी जेष्ठ नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, गटनेते संभाजी आहेर, माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार यांनी गेल्या एक वर्षांपासून आमदार डॉ राहुल आहेर, भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. (Deola)

Deola | आकडे व विजसमस्या मुक्त” माळवाडी गावात लाईनमन दिवस साजरा

यासाठी शासनाने देवळा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी १० कोटी रुपये तसेच नगर पंचायत हद्दीतील मटन मार्केट बांधकामासाठी १ कोटी व सप्तशृंगी नगर ते स्वामी समर्थ नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाच्या बांधकामासाठी ५० लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर केल्याने नगराध्यक्षा भाग्यश्री पवार, उप नगराध्यक्ष मनोज आहेर आदींसह नगरसेवकांनी याकामी आभार मानले आहेत. या विकास कामांमुळे देवळा शहराच्या वैभवात भर पडणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (Deola)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!