Deola | आकडे व विजसमस्या मुक्त” माळवाडी गावात लाईनमन दिवस साजरा

0
2
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | ‘आकडे व वीज समस्या मुक्त’ तालुक्यातील माळवाडी गावात ‘लाईनमन दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नाशिक परिमंडळ मुख्य अभियंता दिपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता मालेगाव मंडळ जगदीश इंगळे, कार्यकारी अभियंता युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा तालुक्यातील माळवाडी गावात देवळा महावितरण अधिकारी व कर्मचारी यांच्या पुढाकाराने गेली वर्षभर सतत कार्यरत राहून महावितरणच्या माध्यमातून व ग्रामस्थांच्या विशेष सहकार्याने दर्जेदार व शाश्वत वीजपुरवठ्यासाठी तसेच वीज गळती कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करून आदर्श माळवाडी गाव तालुक्यात आकडे व विजसमस्या मुक्त करण्यात आले.

सदर गावात १७ रोहित्र ५६० घरगुती ग्राहक, ३१० कृषी ग्राहक असून ,सद्य स्थितीत एकही रोहित्र अतिभारीत नसून सर्व रोहित्र बॉक्स पेटी एच.टी, एल.टी लाईन अर्थिंग दुरुस्ती पूर्णपणे करण्यात आले आहे. तसेच अनधिकृत व कायम स्वरूपी थकीत ग्राहकास वीज जोडणी शुल्क रक्कम भरून अधिकृत करण्यात आले आहे. सदर गावात वीज चोरी होणाऱ्या भागात केबल टाकून प्रतिबंध करण्यात येऊन गाव आकडे मुक्त करण्यात आले आहे. वर्षभरापूर्वी शेतीमुळे अर्थव्यवस्था अडचणीत आल्याने सदर गावाने गाव विकण्यासाठी ठराव केला होता त्या निमित्ताने महावितरण अधिकारी व कर्मचारी यांनी दाखल घेऊन सदर गावात वीज समस्यांचे वर्षभर नियोजन करून सर्व प्रलंबित काम मार्गी लावून गाव आकडे व वीजसमस्या मुक्त केले.

Deola | परराज्यातील पोलिसांकडून देवळा येथील महिलेला रेल्वेत घडले माणुसकीचे दर्शन

त्यामुळे देवळा उपविभाग व ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने माळवाडी गावात बहुसंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत लाईनमन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी माळवाडी गावातील लाईनमन विनोद शेवाळे यांच्या विशेष योगदाना मुळे उपकार्यकारी अभियंता. बंकट सुरवसे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला, प्रवीण पवार यांनी कनकापूर, वडाला गावातील थकबाकी शून्य केल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, उपविभागातील सर्व जनमित्रांचा लाईनमन दिवसानिमित्त सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक घनश्याम कुंभार, सहाय्यक अभियंता लोहोणेर कक्ष यांनी केले. यावेळी कुंभार यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या सहकार्यामुळे व उपकार्यकारी अभियंता सुरवसे यांच्या पुढाकाराने माळवाडी गाव आकडे व वीज समस्या मुक्त करण्यासाठी जनमित्र विनोद शेवाळे व ग्रामस्थानी मदत केली. तर सुरवसे यांनी ऊन, वारा, पाऊस, करोना सारखी महामारी अशा विपरीत परिस्थितीमध्ये महावितरण जनमित्र कार्य करीत असतो. त्यांच्या कार्यामुळे महावितरण कंपनीची लौकिकात भर पडते, त्यामुळे जनमित्र हा प्रकाशदूत सोबत महावितरण विविध योजना ग्राहकांपर्यंत पोहोचविणे साठी खरा दूत आहे.

महावितरण राज्यातील ३ कोटी ग्राहकांना सेवा देत “ईज ऑफ लिव्हिग” च्या निकषां नुसार वीज ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा मिळण्यासाठी महावितरण विशेष मोहीम राबवित आहे. या बाबतीत देवळा उपविभाग सतत अग्रेसर असून फेब्रुवारी महिन्यात व्यवस्थापनाने घरगुती, व्यापारी व औद्योगिक वीज वसूली मध्ये उदिष्ट पूर्ण करून परिमंडळ उपविभाग मध्ये अव्वल स्थान असून हे सर्व यश जनमित्रांचे असल्याचे आवर्जून सांगितले. भविष्यात देखील अव्वल राहील ही अपेक्षा व्यक्त केली. मुख्यमंत्री सौर योजने अंतर्गत देवळा उपविभाग मध्ये 80 MW वीज निर्मिती करून शेतकर्यांना दिवसा वीज पुरवठा मिळणार आहे.

Deola | माळवाडी येथे महाशिवरात्री निमित्ताने भव्य कीर्तन सोहळा

या योजने अंतर्गत डिसेंबर २०२४ पर्यंत ७००० MW सोलर वीज निर्मिती करून १३ हजार कोटी क्रॉस सबसिडी व राज्य सरकार दोन हजार कोटी अनुदानात बचत करणार आहे. पंतप्रधान सूर्य घर योजने अंतर्गत घरगुती ग्राहकांसाठी १ ,२ किलो वॅट पर्यंत ३० हजार ते ६० हजार अनुदान देण्यात येणार आहे. तरी या योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा व जनमित्रांनी दूत म्हणून हि योजना घराघरा पर्यंत पोहोचविण्याचे कार्य करावे असे सांगितले. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होऊन पैशांची बचत होईल.

‘सौरऊर्जा महाराष्ट्राची शान, छतावर होईल वीज निर्माण’, ‘रूफटोप सोलर योजना निसर्गाचे दान घरोघरी वीज होईल निर्माण’, त्यामुळे मुबलक वीज निर्मिती होऊन महाराष्ट्र पुढे जाईल हे स्पष्ट केले. उपसरपंच मयूर बागुल यांनी महावितरण अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक करून चांगल्या कार्यासाठी माळवाडी ग्रामस्थ सतत आपल्या पाठीशी राहील. त्याची ग्वाही देऊन लाईनमन दिनाच्या सर्व लाईनमन यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी फुले माळवाडीचे लंकेश बागुल, जितेंद्र देवरे, गौरव पगार, कैलाश शिवदे, जनमित्र गुलाब आहेर, सचिन निकम आदी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार गौरव पगार यांनी मानले .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here