Ayodhya | मंत्री भुजबळांकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘पंचवटी-अयोध्या आस्था एक्सप्रेस’ची व्यवस्था

0
3
Ayodhya
Ayodhya

Ayodhya |  राज्याचे अन्न, नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या ‘प्रभू रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी प्रवास’ या संकल्पनेतून येवला व नांदगाव विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांना रामलल्लाचे दर्शन घडविण्यात येणार आहे. प्रभू रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी या प्रवासासाठी ‘पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस’ची व्यवस्था करण्यात आली आहे. या पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेसला मनमाड रेल्वे स्थानक येथे मंत्री छगन भुजबळ हे स्वतः उपस्थित राहून हिरवा झेंडा दाखविणार आहे.(Ayodhya)

नाशिक ही प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. सुमारे १४ वर्षाहून अधिक काळ प्रभू रामचंद्राचे या नगरीत वास्तव्य राहिले आहे. त्यामुळे प्रभू रामचंद्राची कर्मभूमी असलेल्या नाशिक ते जन्मभूमी असलेल्या अयोध्या हा प्रवास होऊन प्रभू रामलल्लाचे दर्शन ज्येष्ठ नागरिकांना व्हावे यासाठी मंत्री छगन भुजबळ आणि  माजी आमदार पंकज भुजबळ यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना ‘पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस’ची व्यवस्था करण्यात आली आहे.(Ayodhya)

Samruddhi Mahamarg | स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणार – मंत्री दादा भुसे

Ayodhya | २२ डब्यांची ‘पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस’

प्रभू रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी प्रवासासाठी सुमारे २२ डब्यांची ‘पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस’ ही दि.६ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ८.१० वाजता मनमाड स्थानकातून अयोध्या कडे प्रयाण करेल. त्यानंतर दि.७ मार्च २०२४ रोजी रात्री ९.३० वाजता अयोध्या येथे ही ट्रेन पोहचणार आहे. तर दि.८ मार्च २०२४ रोजी दुपारी ४.४० वाजता अयोध्या येथून मनमाडकडे प्रयाण करून दि. ९ मार्च २०२४ रोजी रात्री ८ मनमाड येथे पोहचणार आहे.(Ayodhya)

Yeola Muktibhumi | येवला मुक्तीभूमी येथील १५ कोटींच्या विकास कामांचे रविवारी लोकार्पण

नागरिकांच्या मदतीसाठी प्रत्येक डब्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते

सदर प्रवासामध्ये जेवण, नाश्ता, चहा यासह निवासाची व दर्शनाची सुविधा असणार आहे. या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी प्रत्येक डब्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते असणार आहे. या प्रवासातील नियोजनासाठी प्रमुख २२ पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती तयार करण्यात आली आहे.(Ayodhya)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here