Advay Hiray | बँक फसवणूक प्रकरणी अद्वय हिरेंच्या कोठडीत आणखी वाढ

0
1
Advay Hiray
Advay Hiray

Advay Hiray |  रेणुका यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेसाठी जिल्हा बँकेकडून कर्ज घेण्यासाठी बनावट दस्तऐवज तयार करून नाशिक जिल्हा बँक (नामको)ची तब्बल ७ कोटी ४६ लाख रुपयांचे कर्ज घेऊन तसेच या कर्जाची परतफेड न करता बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना भोपाळमधून ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणी ते न्यायालयीन कोठडीत आहेत. (Advay Hiray)

या प्रकरणी अद्वय हिरे यांचा जामीन अर्ज पुन्हा एकदा मालेगाव अपर सत्र न्यायालयाने फेटाळला असून, काल दिवसभर अद्वय हिरे यांच्या जामीन अर्जावर पार पडलेल्या सुनावणीत मालेगाव न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत निकाल राखीव ठेवला होता. दरम्यान, न्यायालयाने निकाल दिला असून, अद्वय हिरे यांचा जामीन फेटाळला असल्याने हिरे यांची कोठडी आणखी वाढली आहे. (Advay Hiray)

Malegaon | हिरे कुटुंबीयांचे हात बरबटलेलेच; काळ्या करणाम्यांची मालिका सुरूच

हिरेंचा जमीन अर्ज पुन्हा फेटाळला

या प्रकरणी नाशिक जिल्हा बँक वकील ॲड. वासिफ शेख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, “सुरुवातीला अद्वय हिरे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, तो न्यायालयाने फेटाळला असून, त्यानंतर अद्वय हिरेंनी पुन्हा अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, उच्च न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर ते फरार होते. त्यांना पोलिसांनी भोपाळ येथून अटक केली होती. तर, या प्रकरणी हिरे हे न्यायालयीन कोठडीत असून, त्यांचा जमीन अर्ज पुन्हा एकदा कोर्टाने फेटाळला आहे. (Advay Hiray)

Malegaon | अद्वय हिरेंना जामीन नाहीच; कोठडीत आणखी वाढ

Advay Hiray | नेमकं प्रकरण काय..?

अद्वय हिरे यांनी सन २०१३ मध्ये रेणुकादेवी सहकारी सुतगिरणीसाठी नाशिक जिल्हा बँकेकडून ७ कोटींचे कर्ज घेतले होते. या काळात अद्वय हिरे हे नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी पहिल्या टप्प्यात २ कोटी ८० लाख रुपये कर्ज घेटले असून, तारण दिलेली मालमत्ता ही केवळ १ कोटी ५१ लाख इतकी होती. दरम्यान, या तारण मालमत्तेवर एकूण तीन टप्प्यात तब्बल ७ कोटी ४६ लाख रुपये कर्ज देण्यात आलेले आहे. एवढेच नाही तर, थकबाकी व्याजासह मूळ रक्कम देखील थकीत आहे. तर, कर्ज घेतलेल्या रक्कमेपैकी ६ कोटी रुपये हे हिरे यांनी रेणुकादेवी सुतगिरणीच्या खात्यामधून व्यंकटेश बँकेत वर्ग केले होते. (Advay Hiray)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here