Skip to content

Rajan Vichare | दादा भूसेंच्या व्याहींनवरही ईडीची धाड

Rajan Vichare

Rajan Vichare |  आज सकाळीच ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी आणि कार्यालयासह आणखी ७ ठिकाणी ईडीचा छापा पडलेला असताना, आता ठाण्याचे खासदार राजन विचारे हेदेखील आता ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. एकाच दिवशी उद्धव ठाकरेंच्या एकामागोमाग दुसऱ्या नेत्यावरही ईडीची धाड पडली आहे. त्यातही विशेष म्हणजे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल हा अवघ्या काही तासांत लागणार असताना ठाकरे गटाच्या या बड्या नेत्यांवर कारवाई होत असल्याने हे सर्व सूड प्रवृत्तीने होत आहे का ? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.(Rajan Vichare)

ठाण्याचे ठाकरे गटाचे महत्त्वाचे शिलेदार असलेले खासदार राजन विचारे यांच्या घरी आज काही महत्त्वाच्या कागदपत्रांची तसेच मालमत्तांची विशेष पडताळणी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, नेमके त्यांच्यावर कोणते आरोप लावण्यात आले आहेत आणि कोणत्या प्रकरणात त्यांची ही चौकशी सुरू आहे. याबाबत कुठलाही अधिकृत दुजोरा हाती लागलेला नाही. दरम्यान, आज दुपारपासून खासदार राजन विचारे यांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाची ही कारवाई सुरू आहे. तर, आता विचारे यांच्या घरी काय पुरावे सापडतात आणि त्यांच्यावर यात पुढे काय कारवाई होईल ? हे पहावे लागणार आहे. (Rajan Vichare)

Mumbai | आज सकाळीच ‘ईडी अस्त्र’ बरसलेला ठाकरेंचा ‘तो’ नेता कोण..?

Rajan Vichare | कोण आहेत खासदार राजन विचारे..?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजधानी असलेल्या ठाण्याचे राजन विचारे हे खासदार आहेत. सलग दुसऱ्यांदा राजन विचारे हे ठाण्याचे खासदार राहिलेले आहेत. ते याआधी आमदार आणि नगरसेवकही राहिलेले आहेत. दरम्यान, शिवसेनेचे बंद झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या गटातच राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. मात्र, राजन विचारे हे शिंदेंचे अतिशय जवळचे असूनही त्यांनी शिंदे गटात न सामील होता ते ठाकरेंचे निष्ठावंत राहिले. यासोबतच, ते नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच मुख्यमंत्री शिंदेंचे अत्यंत जवळचे असलेले दादाजी भुसे यांचे व्याहीदेखील आहेत. (Rajan Vichare)

Sanjay Raut | आरोप करणे त्यांचा ‘धंदा’; संजय राऊतांना मेंटल हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज

दरम्यान, आज सकाळीच ठाकरेंचे अत्यंत विश्वासू असलेले रवींद्र वायकर यांच्या घारी सकाळी आठ वाजताच ईडीचे अधिकारी दाखल झाले आणि आता त्याच दिवशी दुपारी खासदार राजन विचारे यांच्या घारी इडीची धाड पडली आहे. दरम्यान, याआधी ठाकरेंचे संजय राऊत, अनिल परब यांच्याही घरी ईडीनी छापेमारी केली होती आणि संजय राऊत यांना अटकदेखील केली होती. याप्रकरणी त्यांना तब्बल तीन महिने तुरुंगात ठेवले होते. (Rajan Vichare)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!