Mumbai | आज सकाळीच ‘ईडी अस्त्र’ बरसलेला ठाकरेंचा ‘तो’ नेता कोण..?

0
1
Mumbai
Mumbai

Mumbai |  उद्या राज्याच्या राजकारणाचा ऐतिहासिक आणि बहू प्रतीक्षित असा शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल हा लागणार आहे. दरम्यान, त्याच्या एक दिवस आधीच शिवसेना ठाकरे गटाच्या एका बड्या आणि उद्धव ठाकरे यांचे अतिशय विश्वासू नेते रवींद्र वायकर यांच्या घरी आज सकाळीच ईडीच्या अधिकाऱ्यांची धाड पडली आहे.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबासोबत रायगड येथे एक बेकायदेशीरपणे जमीन खरेदीचा आरोप हा भाजपकडून करण्यात आला होता. याप्रकरणी आज रवींद्र वायकर यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. आज सकाळच्या सुमारासच ईडीच्या अधिकाऱ्यांनी वायकरांच्या घर आणि कार्यालयासह एकूण सात ठिकाणी ही छापेमारी केली असून, यामुळे आता राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. पण आज सगळ्या न्यूज चॅनेलच्या हेडलाइन वर असलेले ‘रवींद्र वायकर’ हे नेमके आहेत तरी कोण..?(Mumbai)

Mumbai Police | राज्यात पोलिसच सुरक्षित नाही; ८ महिला पोलिसांवर बलात्कार

Mumbai | अशी आहे कारकीर्द… 

रवींद्र दत्ताराम वायकर हे आधी मुंबई महापालिकेत तब्बल २० वर्षे नगरसेवक होते. १९९२ मध्ये ते जोगेश्वरीमधून पहिल्यांदा मुंबई महापालिकेत नगरसेवक झाले. त्यानंतर ते सलग २००९ , २०१४ व २०१९ या काळात सलग तीन वेळेस जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून ते निवडून आलेत. तसेच या काळात ते सलग तीन वेळा मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्षही होते. रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील अत्यंत खास आणि विश्वासू सहकारी आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत, अभ्यासूपणा आणि दूरदृष्टी यामुळेच ते उद्धव ठाकरेंच्या जवळचे राहिलेले आहेत.(Mumbai)

२०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांची गृहराज्यमंत्री पदी वर्णी लावलेली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या काळात वायकरांना कॅबिनेट मंत्रीपद देण्याची शक्यता होती. मात्र, ठाकरेंनी त्यांना ऑफिस चे चीफ कोऑर्डिनेटर पद दिले होते. (Mumbai)

Mumbai Crime | ‘ती’ घरात एकटी असल्याचा डाव साधत बापानेच मुलीला…

असे आहेत आरोप

आज सकाळच्या सुमारास ईडीने वायकरांच्या ७ ठिकाणांवर धाड टाकल्या आहेत. एकूण १२ ईडी अधिकारी हे वायकर यांची तपासणी करत आहेत. वायकर यांच्यावर काही आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप आहेत. तसेच जोगेश्वरी येथील एका भूखंड घोटाळ्यातही वायकरांचा हात असल्याचे त्यांच्यावर आरोप आहे. मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक बागेच्या जागेत अनधिकृत बांधकाम केल्याचाही आरोप आहे. जोगेश्वरी- विक्रोळी येथील लिंक रोडवर व्यारवली या गावात पालिकेच्या भूखंडावर हे बांधकाम झाले असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई महापालिकेच्या काही जागांवर वायकर यांनी त्यांचे पंचतारांकित हॉटेल बांधले आहेत. त्याची किंमत ही आजमितीस तब्बल ५०० कोटी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या सर्व आरोपांमुळेच वायकरांवर ही चौकशी बसवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.(Mumbai)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here