Raj Thackeray | काळारामाचं दर्शन घेऊन मनसे फुंकणार लोकसभेचे रणशिंग

0
26
Raj Thackeray
Raj Thackeray

Raj Thackeray |  राज ठाकरे हे काल नाशिकमध्ये दाखल झाले असून, पूढील तीन दिवस ते नाशिक दौऱ्यावर आहेत. यंदा मनसेचा १८ वा वर्धापन दिन सोहळा नाशिकमध्ये होत असून, या पार्श्वभूमीवर शहरात मोठी वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. काल संध्याकाळी त्यांचे नाशकात आगमन झाले. यावेळी मनसैनिकांकडून ठाकरे कुटुंबीयांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

दरम्यान, आज सकाळी त्यांनी पंचवटी येथील काळाराम मंदिरात सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी राज ठाकरेंच्या हस्ते आरती झाली. तर, अमित ठाकरे यांनी यावेळी मंदिरात सपत्नीक पूजा केली. राज ठाकरे काळाराम मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले असता त्यांचे नाशिक ढोलच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. मंदिराबाहेर आणि शहरात ठिकठिकाणी मनसेकडून मोठी बॅनरबाजी आणि वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, भावी मुख्यमंत्री, लढायचं ते जिंकण्यासाठीच..अशा आशयाचे अनेक बॅनर परिसरात झळकत आहे. तर, या पार्श्वभूमीवर शहर भगवेमय करण्यात आले आहे. (Raj Thackeray)

Raj Thackeray | राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला; कारण गुलदस्त्यात

‘राज गर्जना’ पक्षाला गतवैभव मिळवून देणार..?

उद्या मनसेचा १८ वा वर्धापन दिन असून, गायकवाड सभागृहात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कार्यकर्त्यांना संबोधित करतील. नाशिक हा कधीकाळी मनसेचा बालेकिल्ला होता. त्यामुळे मनसे आणि नाशिकचे नाते हे फार जूने आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून नाशिकचे राजकीय महत्त्व वाढले आहे. आयोध्येच्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील काळाराम मंदिराला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

आधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक दौऱ्यातून लोकसभेच्या प्रचाराचे नारळ फोडले. त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटानेही नाशिकमधून रणशिंग फुंकले होते. तर, आता मनसेनेही वर्धापन दिनासाठी नाशिकची निवड केली असून, राज ठाकरेंची नाशिकमधील ही ‘राज गर्जना’ पक्षाला पुन्हा गतवैभव मिळवून देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Raj Thackeray)

Raj Thackeray| शहरं आहेत की डान्स बार हेच कळत नाही; माझ्या हातात सत्ता आली तर..- राज ठाकरे

Raj Thackeray | ‘गेम चेंजर’ कार्यक्रम..?

गेल्या काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर असताना तेथील पदाधिकारी उशिराने आल्याने राज ठाकरे यांनी रागात थेट पुणे सोडल्याची घटना घडली होती. त्यामुळे असे काही नाशिकमध्ये होऊ नये, याकरिता शहरातील मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काळजी घेतली आहे.

दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे हे नाशिकमध्ये दाखल होण्यापूर्वीच पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मनसेसाठी ‘गेम चेंजर’ कार्यक्रम ठरू शकतो. त्यामुळे नाशिकमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी, कार्यकर्ते हे नाशिकमध्ये मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. (Raj Thackeray)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here