Raj Thackeray | राज्यात सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात या लोकसभा निवडणुकीत थेट चुरशीची लढाई रंगल्याचे पाहायला मिळाले. यात पक्षाच्या स्थापनेपासून ‘एकला चलो रे ची’ भूमिका घेतलेल्या मनसेनेही उडी मारली आणि राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महायुतीला जाहीर पाठिंबा दिला. मात्र, आता महायुतीत काही चित्र बिनसल्याचे दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात अवघ्या चार-पाच महिन्यांमध्येच विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता असून, या निवडणुकीपूर्वीच महायुतीचे एक चाक घसरण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पुन्हा एकडा पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे (Raj Thackeray) आता आपला पाठिंबा काढून घेण्याची शक्यता आहे.
Raj Thackeray | कोकणमध्ये मनसे विरुद्ध भाजप..?
राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या या निवडणुकीनेच या वादात ठिणगी पडल्याचे दिसत आहे. येत्या २६ जूनला शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणूक असून, यात ४ मतदार संघांपैकी कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेने अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर केली असून, सध्या हा मतदार संघ भाजपच्या ताब्यात आहे. दरम्यान, या मतदार संघात मनसेने (MNS) उमेदवार जाहीर केला असून, भाजपचे आशिष शेलार यांनीही भाजप (BJP) उमेदवार देणार असल्याचे सांगितले. भाजपकडून विद्यमान आमदार डावखेरे यानंच पुन्हा उमेदवारी दिली जाऊ शकते. तर, हाच महायुतीतील वादाचा पहिला टप्पा असल्याचे म्हटले जात आहे. (Raj Thackeray)
Raj Thackeray | राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिवाजी पार्कवर जाहीर सभा
मनसेचा मास्टर स्ट्रोक..?
पक्षाच्या स्थापनेपासून राज ठाकरे आणि त्यांचा पक्षा हा कोणसोबतही युती किंवा आघाडीत दिसला नाही. मात्र, आता लोकसभा निवडणुकीपासून राज ठाकरे यांनी वेळोवेळी आपली भूमिका बदलली आहे. दरम्यान, महायुतीचा प्रचार करत असताना आणि महायुतीला पाठिंबा असूनही आता राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर करत आपले राजकीय वजन वाढवण्याचा आणि भूमिका बदलामुळे झालेली आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला आहे.(Raj Thackeray)
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांसाठी राज ठाकरे यांनी सभा घेतल्या. त्यांचा भरपूर मानपानही केला. त्यामुळे आता कोकण पदवीधर मतदारसंघात एकतर भाजपला स्वतः माघार घेत मनसेच्या अभिजीत पानसे यांना पाठिंबा द्यावा लागणार आहे. तत्पूर्वी भाजपचे नेते राज ठाकरे यांची समजूत काढणार का..? आणि राज ठाकरे काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे.
Raj Thackeray | ‘मोदी नसते तर, राम मंदिर झाले नसते’; ठाकरेंकडून मोदींवर ‘कौतुकसुमने’..?
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम