Brijshushan sharan singh | भाजप खासदाराच्या मुलाच्या ताफ्यातील फॉर्च्युनरने दोघांना चिरडले

0
86
Brijshushan sharan singh
Brijshushan sharan singh

कैसरगंज : राज्यभरात पुणे पोर्शे कार अपघात (Pune Accident) प्रकरणामुळे संताप व्यक्त होत असून, या प्रकरणाचे रोज नवनवीन पैलू उलगडत आहेत. ही घटना ताजी असतानाच अता आणखी एक अपघात प्रकरण समोर आले असून, यानुसार एका भाजप खासदाराच्या मुलाच्या ताफ्यातील फॉर्च्युनर गाडीने दोघांना चिरडल्याची घटना उघडकीस आली आहे.

पुणे अपघात प्रकरणी बड्या बापाच्या मुलाला वाचवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय नेत्यांनी किती सजगतेने सर्व जुळवून आणले हे उघड होत असतानाच उत्तर प्रदेशमधील वादग्रस्त खासदार बृजभूषण शरणसिंह (Brijbhushan sharan singh) यांच्या मुलाच्या ताफ्यातील फॉर्च्युनर कारच्या अपघातात दोघांना चिरडल्याची घटना घडली आहे.

खासदार बृजभूषण शरणसिंह यांच्या मुलाच्या ताफ्यातील UP. HW. 1800 या पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर कारने तिघांना धडक दिली असून, या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ब्रिजभूषण शरणसिंह (Brijbhushan sharan singh) यांच्या मुलाच्या ताफ्यातील ही गाडी भरधाव वेगात होती आणि तिने तिघांना उडवले असून, तिघांपैकी दोघांचा याता जागीच मृत्यू झाला आहे. ब्रिजभूषण सिंह यांचे चिरंजीव करण ब्रिजभूषण सिंह हे भाजपचे उत्तर प्रदेशामधील उमेदवार देखील आहेत.

Pune Car Accident | धनिकपुत्राने दोघांना चिरडले, निबंध लिहण्याची शिक्षा; A टु Z स्टोरी

Brijshushan sharan singh | नेमकं काय घडलं..?

दरम्यान, भाजप उमेदवार करणसिंह यांना उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून भाजपने तिकीट दिले आहे. देशातील लोकसभा निवडणुकांचा सातवा आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान हे १ जून रोजी पार पडत आहे. या शेवटच्या टप्प्यातील प्रचारासाठी करण शरणसिंह (Brijbhushan sharan singh) यांचा ताफा हा कैसरगंज येथून हुजूरपूरकडे जात असताना बैकुंठ डिग्री कॉलेजजवळ हा अपघात घडला. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि ही फॉर्च्युनर कार जप्त केली. तर, घटनास्थळी अपघात झाल्यानंतर न थांबता करणसिंह पुढे निघून गेले. यामुळे पुणे आणि यानंतर आता या घटनेमुळे सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

यापूर्वी ऑलिंपिक विजेत्या महिला पैलवानांनी खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत त्यांच्या विरोधात उपोषण आणि आंदोलन केले होते. या घटनेवर देशभरातून तीव्र संतापदेखील व्यक्त करण्यात आला होता. तर याप्रकरणी, न्यायालयाच्या आदेशानुसार भाजप खासदार ब्रिजभूषण शरणसिंह यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने भाजपने या लोकसभा निवडणुकीत त्यांच्याएवजी त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली आहे. आता, त्याच उमेदवार असलेल्या विद्यमान खसदाराच्या मुलाने दोघांचा बळी घेतला आहे.दरम्यान, या प्रकरणी कारवाई होणार..? की राजकीय दबावापोटी प्रकरण दाबले जाणार..? हे पहावे लागणार आहे.

Nana Patole Car Accident | नाना पटोलेंना चिरडून मारण्याचा प्रयत्न; काँग्रेस नेत्याचा दावा..?


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here