Rain Upadate | राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचं सावट; अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान

0
2

Rain Upadate | राज्यात गेल्या आठवड्यापासून सुरु असलेलं अवकाळी पावसाचे संकट अजूनही मात्र कायम आहे. राज्यात 1 आणि 2 डिसेंबर रोजी पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर कुठे ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. 1 डिसेंबर रोजी अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि अकोला जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट असून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Rain Upadate)

कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे होतोय पाऊस

उत्तर केरळपासून ते मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. यामुळे सध्या पुर्ण महाराष्ट्रात पाऊस सुरु आहे. ईशान्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे. उत्तर महाराष्ट्रावर हवेची चक्राकार परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत महाराष्ट्रात पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे. पुणे शहरातदेखील आज पावसाची शक्यता आहे.

अवकाळी पावसात 22 जिल्ह्यांतील नुकसानाची प्राथमिक आकडेवारी शासनाकडून जाहीर

राज्यात 26 ते 28 पर्यंत झालेल्या अवकाळी पावसात 22 जिल्ह्यांतील नुकसानाची प्राथमिक आकडेवारी शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या यादीत अमरावती जिल्हा वगळला गेलेला आहे. अमरावती जिल्ह्यात नुकसान झाले नसल्याचा दावा करण्यात आलेला आहे. प्राथमिक आकडेवारीत अमरावती जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नाही. अमरावतीत कापूस, तुरी आणि संत्र्याचं मोठे नुकसान झाले आहे. पण शासनाच्या नजरेत अमरावती जिल्ह्यात नुकसानच झालेले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पावसामुळे नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिलेले होते. (Rain Upadate )

 

अवकाळी पावसाचा फटका मसाल्यांनादेखील बसणार-Big News | मसाल्यांना दरवाढीची फोडणी? अवकाळीचा मसाला बाजारालाही फटका

अवकाळी पावसामुळे लाल मिरचीचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येच आहे. पावसामुळे मुंबईच्या बाजार समितीत येणाऱ्या लाल मिरचीचे आगमन आता लांबणीवर पडलेले आहे. त्यामुळे आता घरोघरी वर्षभरासाठी मसाला तयार करण्यासाठी लागणाऱ्या लाल मिरचीची टंचाई भासणार आहे. मुंबईच्या वाशीतील घाऊक मसाला बाजारात दिवाळीनंतर मसाल्याच्या मिरचीची आवक सुरू होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here