Big News | मसाल्यांना दरवाढीची फोडणी? अवकाळीचा मसाला बाजारालाही फटका

0
2

Big News | गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात अवकाळी पावसाने शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे यासगळ्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मात्र याचा विपरित परिणाम शहरी जनजीवनावरदेखील होणार आहे. या पावसाने मसाल्यासाठी लागणाऱ्या लाल मिरचीचेही मोठे नुकसान झालेले आहे. अवकाळी पावसामुळे बाजारात येण्यासाठी सज्ज आणि रोपांवर तयार असलेली लाल मिरची पाण्याखाली गेलेली आहे.

Gold Silver rate | ऐन लग्नसराईत सोने-चांदी खाताय भाव

मुंबईच्या बाजारात येण्यासाठी सज्ज असलेल्या लाल मिरचीचे आगमन आता लांबणीवर पडलेले आहे. त्यामुळे घरोघरी वर्षभरासाठी मसाला तयार करण्यासाठी लागणाऱ्या लाल मिरचीची टंचाई भासून त्यांचे दर वाढण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. मसाला बाजारात महाराष्ट्रातील नंदुरबारसह गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात आवक होत असते. यासाठी येथे मोठ्या प्रमाणात मिरची साठवली जाते.

परंतु या सर्व ठिकाणी मोठा पाऊस झाल्यामुळे येथील मिरची पूर्णपणे भिजलेली आहे. मिरचीचे आगार समजल्या जाणाऱ्या नंदुरबारमधून मसाल्यासाठी लागणारी मिरची मोठ्या प्रमाणात येत असते. पण या सर्व ठिकाणी आलेल्या अवकाळी पावसाने ही लाल मिरची भिजली आहे. त्यामुळे मिरचीचे तसेच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजारात असलेल्या 30 हजार क्विंटलहून अधिक मिरचीचे पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झालेले आहे. हे फार मोठे नुकसान असल्याने मुंबईसारख्या बाजारात मसाल्याच्या हंगामात मिरचीची टंचाई भासण्याची शक्यता आहे.

मालेगाव | देवा पाटील यांची तज्ञ संचालक पदी निवड

आताच्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान केलेलं असताना आता दक्षिणेकडील राज्यातदेखील वादळाचा अंदाज वर्तवला जातो आहे. त्यामुळे आता उरलेल्या मिरचीच्या पिकावरदेखील संकट ओढवले असून शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. दरम्यान या अवकाळी पावसाने जिथे-जिथे मसाल्याच्या मिरचीचे उत्पादन होते तिथे-तिथे हजेरी लावून मिरचीचे मोठे नुकसान केलेलं आहे. याचा मोठा परिणाम यंदाच्या वर्षी मुंबई बाजारात येणाऱ्या मिरचीच्या आवकेवर दिसु शकतो.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here