Gold Silver rate | ऐन लग्नसराईत सोने-चांदी खाताय भाव

0
2
Gold silver rate
Gold silver rate

Gold Silver rate | २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम इतक्या सोन्याची किंमत ही आज रुपये ६२,७२० इतकी असून, मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ही ६२,६४० रुपयांवर बंद झाली होती. बुलियन मार्केट वेबसाइटनुसार, चांदीचा दर हा ७७,१२० रुपये प्रति किलो असा आहे. तर, मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ही ७५,५९० रुपये प्रतिकिलो इतकी होती.

सोने-चांदीची जोरदार मुसंडी

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, मंगळवार (दि. २८) रोजी २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम हा सोन्याचा दर हा ६१,९१३ रुपये असा होता. दरम्यान, आज सोन्याचा भाव हा ६२,६२९ रुपयांवर पोहचला आहे. सोबतच चांदीदेखील चमकली आहे. एक किलो चांदीसाठी आता ७५,७०० रुपये मोजावे लागणार आहेत. तज्ज्ञांच्या मते, चांदी ही अजून जोरदार उसळी घेण्याची शक्यता आहे.

मालेगाव | देवा पाटील यांची तज्ञ संचालक पदी निवड

चांदीची गगन भरारी

गेल्या आठवड्यात चांदीच्या १४०० रुपयांनी किंमती वधारल्या होत्या. २७ नोव्हेंबर रोजी किंमती १००० रुपयांनी वाढल्या होत्या. तर, काल २९ नोव्हेंबर रोजी दरांत ७०० रुपयांनी वाढ झाली होती. गुडरिटर्न्सनुसार, आजचा एक किलो चांदीचा दर हा ७९,२०० रुपये असा आहे.

असा आहे १४ ते २४ कॅरेटचा दर 

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, २४ कॅरेट सोने हे ६२,६२९ रुपये तर, २३ कॅरेट सोने हे ६२,३७८ रुपये असे आहे. २२ कॅरेट सोन्याचे दर हे ५७,३६८ रुपये झाले आहे. तर, १८ कॅरेट सोन्याचे दर हे ४६,९७२ रुपये असे आहेत. दरम्यान, १४ कॅरेट सोन्याचा दर हा ३६,६३८ रुपये प्रति १० ग्रॅम असा आहे. आणि एक किलो चांदीचा दर हा ७५,७०० रुपये असा आहे.

Today’s horoscope 30 Nov: या 5 राशींना राजकारणात यश मिळू शकते, जाणून घ्या आजचे राशी भविष्य

कुठे कसे आहेत दर..? 

बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार, राज्यात मुंबईत २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर हा ५७,४९३ रुपये असा आहे. तसेच मुंबईत २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर हा ६२,७२० हा आहे. पुण्यात २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम इतक्या सोन्याचा दर हा ५७,४९३ आहे.  तर, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅमचा दर हा ६२,७२० रुपये आहे. नागपूरमध्ये २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव हा ५७,४९३ आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव हा ६२,७२० रुपये असा असेल. नाशिकमध्येही २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर हा ५७,४९३ असून, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर हा ६२,७२० रुपये इतका आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत तसेच त्यात जीएसटी, टीसीएस व इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधावा.)

Mlg: मंत्री भुसेंच्या संकल्पनेतून रंगणार कीर्तन सोहळा; नव वर्षाचे आध्यात्मिक ‘गिफ्ट’


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here