Skip to content

मालेगाव | देवा पाटील यांची तज्ञ संचालक पदी निवड


सोमनाथ जगताप-प्रतिनिधी : मालेगाव | येथील आर्थिक नाडी मानल्या जाणाऱ्या भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था सोयगाव मालेगाव ह्या पतसंस्थेची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक पार पडली आहे. ह्या निवडणुकीत यु. आर. पाटील यांच्या नेतृत्वात सुभाष नहिरे, जितेंद्र देसले, दीपक चौधरी, प्रवीण केसकर, संदीप खराडे, दीपक तलवारे, दिलीप शिंदे, महेश लोंढे, सौ. रूपाली प्रेम पाटील, सौ. जयश्री संजय महाले हे कर्मवीर पॅनलचे सर्वच्या-सर्व अकरा उमेदवार विजयी झालेले आहेत.

Today’s horoscope 30 Nov: या 5 राशींना राजकारणात यश मिळू शकते, जाणून घ्या आजचे राशी भविष्य

सभासदांनी यु. आर. पाटील यांच्या कामावर विश्वास ठेवत एकहाथी सत्ता दिलेली आहे. चेअरमन पदी विराजमान झालेले पॅनल प्रमुख यु. आर. पाटील आणि व्हाईस चेअरमन सौ. जयश्री संजय महाले पाटील तसेच सर्व संचालकांनी देवा पाटील यांची एकमताने तज्ञ संचालक पदी निवड केलेली आहे.

Mlg: मंत्री भुसेंच्या संकल्पनेतून रंगणार कीर्तन सोहळा; नव वर्षाचे आध्यात्मिक ‘गिफ्ट’

देवा पाटील यांनी मागील काळात मालेगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आपली उमेदवारी अर्ज मागे घेऊन मालेगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळ बिनविरोध करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले होते. याच कारणाने त्यांच्या हितचिंतकानी अनेक वेळा नाराजी व्यक्त केलेली होती मात्र भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी बँक निवडणुकी नंतर चेरमन यु. आर. पाटील यांनी त्यांना सहकार क्षेत्रात सामाजिक काम बघता संधी देण्याचा जो निर्णय घेतला त्याचे सर्व स्थरातून स्वागत करण्यात येत असून देवा पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!