Skip to content

Yeola | ‘जमीनीचा ७/१२ आमच्या बापाचा’; भुजबळांच्या येवला दौऱ्याला मराठ्यांचा विरोध

Chhagan Bhujbal

Yeola |  राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुबबळ हे आज त्यांच्या येवला मतदार संघातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. पण, त्यांच्या ह्या दौऱ्याला येवला मतदारसंघातूनच विरोध होत आहे. भुजबळांच्या ह्या दौऱ्याला येवल्यातील मराठा समाजाने विरोध केला आहे. आम्ही नुकसान सोसू, पण तुम्ही आमच्या बांधावर येऊ नका, अशी भूमिकाच येथील गावकऱ्यांनी घेतली आहे.

तसेच शासन दरबारी आम्हाला निधी उपलब्ध करुन द्या, आमच्या बांधावर येण्याचा अट्टाहास कशाला? असा सवालही येथील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. इतकंच नाही तर सोमठानदेश ह्या गावात “भुजबळ गो बॅक” अश्या घोषणाही देण्यात आल्या होत्या. त्यांच्या ह्या दौऱ्याला विरोध करणारे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Gold Silver rate | ऐन लग्नसराईत सोने-चांदी खाताय भाव

मंत्री छगन भुजबळ यांना त्यांच्याच येवला ह्या मतदारसंघातुन इतक्या मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. छगन भुजबळ ह्यांनी आज मतदारसंघातील गारपीटग्रस्त भागाचा दौरा केला. दरम्यान, ह्या दौऱ्या पूर्वीच छगन भुजबळ यांच्या ह्या पाहणी दौऱ्याला विरोध झाला होता. भुजबळ यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवणारी एक ऑडिओ क्लिप देखील सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. दरम्यान, “मला कोणीही गावबंदी करू शकत नाही, मी कुणालाही घाबरत नाही’. असं यावेळी छगन भुजबळ म्हणाले.

काय आहे संभाषण?

ग्रामस्थ – भुजबळ साहेब मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही येऊ नका, आमच्या गावाच्या बांधावर येऊ नका.

छगन भुजबळ – बघू, काय करायचं ते?

ग्रामस्थ – तुम्ही आले तर इथलं वातावरण खराब होईल. ही सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे. की, तुम्ही बांधावर येऊ नये

छगन भुजबळ – बरं….

ग्रामस्थ – ह्या जमीनींचा ७/१२ आमच्या बापाच्या नावावर आहे.

छगन भुजबळ – मला कोणी म्हटलं, या तर मी तिथे जाईल. नाही म्हटलं तर ते बघू.

ग्रामस्थ – तुम्हाला कोणीच या म्हणत नाही. आमच्या गावचा ठराव झालेला आहे. त्यामुळे तुम्ही येऊ नकाच.

छगन भुजबळ –  तुम्ही चार लोकं म्हणजे ठराव होतो का?

छगन भुजबळ – मी घाबरत नाही कोणाला

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे बुधवारी रात्री येवला येथे दाखल झाले. तर, गुरुवारी सकाळी ते भागातील शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. मला कोणीही गावबंदी करू शकत नाही. मी कुणालाही घाबरत नाही, असं यावेळी भुजबळ म्हणाले. मराठ्यांना जर ओबीसीत बळजबरीनं टाकलं तर, त्यांना काहीच मिळणार नाही, मराठा समाजातील समजूतदार लोकांना हे लक्षात येत आहे. असंही भुजबळ पुढे म्हणाले.

मालेगाव | देवा पाटील यांची तज्ञ संचालक पदी निवड


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!