Crime news | चिकन न दिल्याने पतीने मुलीच्या डोक्यात घातली वीट

0
1

Crime news |   पत्नीने जेवणात चिकन न बनवल्याने रागाच्या भरात पतीने घराशेजारी खेळत असलेल्या  एका लहान मुलीच्या डोक्यात वीट मारल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील ‘पाषाण’ येथे एक घडली आहे. दरम्यान, या घटनेत लहान मुलगी ही गंभीर जखमी झालेली आहे. नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी ह्या माथेफिरू पतीवर गुन्हा दाखल केला आहे. सोमवार (दि. २७ नोव्हेंबर) रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. (Crime news)

विकास राठोड असे ह्या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. पती-पत्नीमध्ये मागील काही काळापासून वाद सुरू होते.  त्यात पत्नीने जेवणात चिकन न दिल्याने रागात असलेल्या पतीने लहान मुलीच्या डोक्यात वीट मारून, तिला गंभीर जखमी केले आहे. ही घटना पाषाण येथील वाकेश्वर रस्ता ह्या परिसरात घडली. या प्रकरणी, महिलेचेच्या नातेवाईकांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यावरून पोलिसांनी आरोपी विकास नागनाथ राठोड (रा. वाकेश्वर रस्ता, पाषाण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.

आरोपी विकास राठोडला सोमवार रोजी रात्रीच्या वेळी पत्नीने जेवण दिले. पण, जेवणात चिकन नसल्याने चिडून त्याने लहान मुलीच्या डोक्यात वीट घातली. याबाबत चतु:श्रृंगी पोलीस हे या प्रकरणाच पुढील तपास करत आहे. पण, अद्यापही पोलिसांनी ह्या आरोपीला अटक केलेली नाही. दरम्यान,मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Crime news)

Chandwad | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडे शेतकऱ्यांचं साकडं!

चोरीची दुसरी घटना,साडे सतरा लाख लंपास 

याकाळात दिवाळी निमित्त अनेक जण फिरायला जात असतात. दरम्यान, ह्या काळात घरांत घरफोडी सारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दरम्यान, पुण्यात गणेशखिंड ह्या रस्त्यावरील भोसलेनगर या परिसरातील दिवाळीच्या सुट्टीत बाहेरगावी गेलेल्या एका कुटुंबाच्या बंद घराचे टाळे तोडत घरात प्रवेश करून घराच्या कपाटातून सोने-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कमही चोरट्यांनी लंपास केली.

दोन दिवसानंतर घरी आल्यानंतर या घटनेची माहिती संबंधित कुटुंबाला मिळाली व त्यांनी तात्काळ त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर चोरी झाल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला. त्याप्रमाणे पोलिसांनी ह्या चोरट्यांचा शोधही सुरु केला आहे. (Crime news)

पुण्यातील गणेशखिंड ह्या रस्त्यावरील भोसलेनगर परिसरातील सदनिकेतून चोरट्यांनी १७ लाख ४५ हजार रुपये किंमतीचे ४५ तोळे सोने तसेच हिऱ्याचे दागिने चोरले. सोबतच, याच परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यातूनही चोरट्यांनी ३३ लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटनाही याआधी नुकतीच घडली होती. या प्रकरणी चतु: शृंगी पोलिसांत तक्रार दिली आहे.

LPG Price | सर्वसामान्यांच्या खिशाला चटका!; सिलिंडरच्या दरात वाढ,

चोरट्यांनी फिर्यादिंच्या सदनिकेतील कपाटातून ४५ तोळे सोन्याचे तसेच हिऱ्याचे दागिने चोरले. दरम्यान, दोन दिवसांनी फिर्यादी घरी परतल्यावर चोरी झाली असल्याचे लक्षात आले. दरम्यान, या प्रकरणाचा सविस्तर तपास हा सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील हे करत आहेत. भोसलेनगर ह्या परिसरात दोन दिवसांपूर्वीच एका बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यातून चोरट्यांनी दागिने व रोकड असा ३३ लाखांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Crime news)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here