Breaking news | मोठी बातमी! ह्या जागा अजित दादा गट लढवणार

0
1

Breaking news |  आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.  महायुतीत लोकसभेच्या चार जागा ह्या अजित पवार गट लढवणार असल्याचे आज स्वतः अजित पवारांनी जाहीर केले आहे. बारामती, शिरूर, सातारा, रायगड ह्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस हे निवडणूक लढवणारच आहे, असे अजित पवार यांनी जाहीर केलेले आहे. सध्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे लोकसभेच्या ह्या चार जागा आहेत. बारामती, सातारा, रायगड, शिरूर ह्या चार जागा ठरलेल्या आहेत.

पुढे अजित पवार म्हणाले की, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीत एनडीएचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे. महाराष्ट्र राज्यातून ४८ खासदार हे आपल्याला निवडून आणायचे आहेत.

Crime news | चिकन न दिल्याने पतीने मुलीच्या डोक्यात घातली वीट
बारामती, शिरूर, सातारा, रायगड ह्या जागा आपण लढवणार आहोत. इतर जागांसंदर्भात आपण मुख्यमंत्री  शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करू. ह्या जागावाटपासंदर्भात सगळ्यांशी प्राथमिक चर्चा झालेली आहे. आपल्या कार्यकर्त्याची ताकद बघता आपण त्यांची निवड करणार आहोत.

अजित पवार म्हणाले की, काही जण हे आमच्यावर आरोप करत आहेत की, यांच्यावर केसेस होत्या म्हणून हे तिकडे गेले. मी कॅबिनेटमध्ये त्या खात्याचा मंत्री होतो म्हणून मला टार्गेट केलं होतं पण, ते आरोपही सिद्ध झाले नाहीत.  मंत्री तसेच विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनीच ते आदेश दिलेले होते. राज्यात ते सातत भारनियमन २०१२ रोजी होत होतं ते आम्हीच बंद केलं होतं. आज माझ्याकडे अर्थ खाते आहे आणि सहा लाख कोटींचं बजेट आहे.

मी कमीटमेंट पाळणारा – अजित पवार

माझ्यावर जे आरोप झाले आहेत ते जलसंपदा विभागाचे त्यानंतर त्याचा विकास रेंगळाला. मी कामाला मान्यता देतो म्हणुन मला टार्गेट केलं. त्यावेळी नेमलेल्या समितीचा अहवालही आला व त्यांनी मला क्लीन चीट दिली आहे. ३२ वर्ष मी काम राज्यात करतोय. मला विचारलं जातं की, माझ्यावरच आरोप का होत असतात. पण, मी कमीटमेंट पाळणारा नेता आहे. माझ्याकडे जीएसटी विभागही होता. माझ्यावर आजपर्यंत कुठल्याही डीपीसीसंदर्भात आरोप नाहीत.

Rain Upadate | राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचं सावट; अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान

 जिल्हाध्यक्षांना प्राधान्य 

विकासकामांच्या बाबतीत पहिले प्राधान्य हे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना, दुसरं खासदारांना आणि तिसरं राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना असणार आहे. युवती संघतेनेतही काही वाद आहेत ते वाद अदिती तटकरेंनी मिटवावेत. त्यामुळं युवती विभागाची जबाबदारी तू घे. जास्तीत जास्त महिलांचे प्रश्न सोडवण्याची संधी मिळेल, असेही अजित पवार म्हणाले.

उरलेल्या मंत्र्यांना पालकमंत्रीपद मिळणार 

सध्या असलेल्या पालकमंत्र्यांशिवाय उरलेल्या मंत्र्यांनाही पालकमंत्रीपद मिळावं यासाठी चर्चा करू आणि लवकरच  निर्णय घेणार आहोत. आम्ही बाकी राहिलेल्या मंत्र्याबाबतही पालकमंत्री पद देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. इतर नेत्यांसोबतही लवकरच या विषयांवर बोलणार आहे.

Chandwad | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडे शेतकऱ्यांचं साकडं!


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here