Chandwad | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडे शेतकऱ्यांचं साकडं!

0
29

विकी गवळी | प्रतिनिधी : चांदवड (Chandwad) – राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गुरूवारी (दि. 30) रात्री नाशिक दौऱ्यावर आलेले होते. यावेळी चांदवडच्या शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी चांदवडमधील शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे.( Chandwad news)

Spiritual news | शनिवारी करा ‘या’ मंत्राचा जप, साडेसातीकाळात होतील फायदे!

नाशिक जिल्ह्यात सद्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात द्राक्ष, कांदे, मका, बाजरी या पिकांचे नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांशी चर्चा सुरू होती आणि दुष्काळाची मदत अजूनही मिळाली नाही तसेच पीक विम्याची रक्कम देखील जमा न झाल्याने शेतकऱ्यांनी थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोर आपल्या प्रश्नांचा पाढाच वाचलेला आहे. चांदवड (Chandwad) तालुक्यातील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मागणी करणार असल्याचे सांगितले.यावेळी राष्ट्रवादी तालुका प्रमुख डॉ.सयाजी गायकवाड,नगरसेवक नवनाथ आहेर, शहर अध्यक्ष प्रकाश शेळके,मतीन घासी,रिजवान घासी, विकी जाधव, शेतकऱ्यांसह इतर कार्यकर्ते उपस्थिती होते.

छगन भुजबळांनी केली पाहणी

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे काल नाशिकमध्ये आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची ते पाहणी करत होते. त्यांच्या या दौऱ्याला नाशिकमधील मराठा समाजाने कडाडून विरोध करण्यात आला. सकाळपासूनच नाशिकच्या येवल्यात मराठा समाजाकडून छगन भुजबळ यांचा निषेध केला जात होता. यावेळी मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेत गोमूत्र शिंपडलं होतं.

पालकमंत्री सकाळी सकाळी शेतकऱ्यांच्या बांधावर

निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथे पालकमंत्री दादा भुसे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकर्‍यांच्या पिकांच्या नुकसानीची शेतात जाऊन पाहणी केली होती. यावेळी भुसेंनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांना धीरदेखील दिला. तसेच ज्या शेतकर्‍यांनी पीकविमा काढला असेल, त्या शेतकर्‍यांनीही झालेल्या नुकसानीबाबत पीकविमा कंपनीकडे नोंदणी करण्याचे आदेश अधिकार्‍यांना देण्यात आलेले होते.(Chandwad)
याशिवाय कोणीही आपत्तीग्रस्त नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहू नये, तसेच नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी शेतकर्‍यांना अश्वासित केले आहे. दरम्यान, यावेळी आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम, निफाडच्या उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील, तहसिलदार शरद घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सुर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, कृषी पर्यवेक्षक प्रमोद पाटील, कृषी सहाय्यक योगेश निरभवणे यांच्यासह अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here