Spiritual news | शनिवारी करा ‘या’ मंत्राचा जप, साडेसातीकाळात होतील फायदे!

0
2
Shani Dev
Shani Dev

Spiritual news |  ज्योतिषशास्त्रात शनिदेव ही न्यायाची देवता मानली जाते, ते लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. शनि हे सध्या स्वतःच्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत आहेत. २०२४ मध्येही शनि आपली स्थिती बदलणार नाहीत. दरम्यान, पुढील वर्षीही शनिचे संक्रमण होणार नाही व २०२४ मध्ये देखील ते कुंभ राशीतच राहतील. पण, ही राशी बदलली नाही तरी शनिच्या स्थितीत बदल होईल. २०२४ मध्ये, शनिदेव हे कुंभ राशीत असताना प्रतिगामी व थेट फिरेल. त्यामुळे पुढील वर्षी शनि ग्रह हा काही राशींना खूप त्रास देणारा ठरू शकतो.

या राशींवर असणार शनीची सावली

कलियुगाचा दंडाधिकारी म्हणून शनिदेवाचे वर्णन केलेले आहे. २०२४ मध्ये शनि हा त्याच्या मूळ त्रिकोण राशीत असणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये काही राशींवर शनिची साडेसाती व ढैय्या असणार आहे. पुढील वर्षी शनि हा कुंभ राशीत असल्यामुळे मकर, कुंभ तसेच मीन ह्या राशीच्या लोकांना शनिची साडेसाती भोगावी लागणार आहे.

२०२४ मध्ये मकर राशीच्या लोकांसाठी शनिचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. तर, मीन राशीच्या लोकांसाठी शनिच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होणार आहे आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी शनिच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल. शनिच्या साडेसातीची दुसरी अवस्था ही अत्यंत क्लेशदायक मानली जाते. २०२४ मध्ये ह्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.(Shani Dev)

Gold Silver Rate | सोन्याची माघार; तर चांदी तेजीतच

प्रभावापासून वाचण्यासाठी हे करा उपाय

तर २०२४ मध्ये शनि ग्रह हा कुंभ राशीत असल्याने, वृश्चिक तसेच कर्क राशीचे लोक हे शनिच्या प्रभावाखाली असणार आहेत. शनिची ढैय्या अडीच वर्षांची असणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी वृश्चिक व कर्क राशीच्या लोकांनी कोणतेही काम हे अत्यंत सावधगिरीने करावे. शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी त्याच्या मंत्रांचा जप करणे हे अत्यंत प्रभावी मानले जाते. त्यामुळे दर शनिवारी ह्या मंत्राचा जप केल्याने त्याच्या दुष्परिणामांपासून आराम मिळतो.(Shani Dev)

या मंत्राचा करा जप

अपराधसहस्त्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया।

दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर।।

गतं पापं गतं दु:खं गतं दारिद्रय मेव च।

आगता: सुख-संपत्ति पुण्योऽहं तव दर्शनात्।।

वैदिक मंत्र

१. ऊँ शन्नो देवीरभिष्टडआपो भवन्तुपीतये।

२. शनि देव का एकाक्षरी मंत्र

ऊँ शं शनैश्चाराय नमः।

३. साडेसातीचा प्रभाव टाळण्यासाठीचा शनि मंत्र

ऊँ त्रयम्बकं यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम ।

उर्वारुक मिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मा मृतात ||

४. ॐ शन्नोदेवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये।शंयोरभिश्रवन्तु नः। ऊँ शं शनैश्चराय नमः।

५. ऊँ नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्‌।छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्‌।

Farmer Subsidy scheme | पिकांवरील कीडनियंत्रणासाठी आता मिळणार अनुदान

वरील मंत्रांचे फायदे

वरील शनि मंत्राचा जप केल्याने कीर्ती, संपत्ती, पद तसेच सन्मान प्राप्त होतो. शनिदेव हे धन, धर्म, कृती व न्याय यांचे प्रतिक मानले जाते. दरम्यान, शनि मंत्राचा जप केल्याने धन, समृद्धी व मोक्ष हे शनिदेव प्रदान करतात. शनिदेवाच्या मंत्रांचा जप व शनि चालिसाचा पाठ केल्यामुळे शनिदेव प्रसन्न होतात व ढैय्या तसेच साडेसाती सारख्या कठीण काळातही तुमचे रक्षण करतात.(Shani Dev)

( वरील सर्व बाबी ‘द पॉइंट नाऊ’ केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here