Pune crime : बोलण्यास नकार दिला म्हणून त्याने थेट तिच अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला

0
33

Pune crime : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणाने तरुणीचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. ‘तुला माझ्याशी बोलावेच लागेल , ‘अशी धमकी देत आरोपीने त्या तरुणीचा गळा दाबला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे.

म्हणून तो बैचेन झाला
प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहितीनुसार वडकी येथील रहिवाशी आजीम आयुब मुलाणी (वय २३ ) आणि फिर्यादी १९ वर्षीय तरुणी हे एकाच परिसरात राहतात. त्यामुळे दोघांची एकमेकांशी ओळख झाली ओळख झाल्याने ते नेहमीच संपर्कात येऊन एकमेकांशी बोलत होते, पुढे त्या दोघांची चांगली मैत्री होती. मात्र तरुणीच्या घरच्या लोकांना तथा कुटुंबीयांना ही गोष्ट कळाल्यावर त्यांनी तू त्या तरुणाशी बोलू नको, असे सांगत तिला मनाई केली, त्यामुळे ती त्याच्या बरोबर बोलत नव्हती, त्यामुळे तो बेचैन झाला होता. तरीही आरोपीने अनेकवेळा फोन करुन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडित तरुणीने त्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिसादच दिला नाही. त्यातून मग दोघांमध्ये तेढ तथा वाद निर्माण झाला.

आणि त्याने गळाच दाबला
पण ज्या मुलीला मैत्रिणी मानतो, ती मुलगी आपल्याशी बोलत नाही, याचा त्या तरुणाला प्रचंड रागाला आणि रागाच्या भरातच त्याने याबद्दल तिला विचारण्याची ठरविले. एके दिवशी सकाळच्या सुमारास पीडित तरुणी चौकात थांबली होती. त्यावेळी आरोपी आजीम याने पीडितेला जबरदस्तीने चारचाकी गाडीत बसवून एका मॉलमध्ये घेऊन गेला. तिथे आरोपीने ‘तू माझ्याशी का बोलत नाही? तू जर माझ्याशी बोलली नाहीस, तर मी तुला जीवे मारेन अशी धमकी देत गळा दाबण्याचा प्रयत्न केला. आरोपीच्या तावडीतून सुटून तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीला अटक केली. या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीसांनी दिली. असे प्रकार पुणे शहरात वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here