Women abuse : मेरठ मध्ये मणिपूर घटनेची पुनरावृत्ती


A repeat of Manipur incident in Meerut : मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याचे प्रकरण ताजे असानाच आता उत्तर प्रदेशातील मेरठ मध्ये अशीच घटना समोर आली आहे. मेरठ मध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिला निर्वस्त्र करुन रस्त्यावरून पळविण्यात आले.

मेरठच्या किठोर पोलीस ठाण्याच्या परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली आहे.

नेमकं काय घडलं

मेरठच्या किठोर गावामध्ये तीन महिन्यांपूर्वी घडला. परंतु आता या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. एका तरुणाने अल्पवयीन मुलीला फसवून उसाच्या शेतामध्ये नेले.
या ठिकाणी कोणीही नव्हते, तेथे आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीचे मित्र त्याठिकाणी आले. त्यांनी या घटनेचा व्हिडिओ तयार करण्यास सुरुवात केली. त्यांनी देखील तिच्यावर अत्याचार केले.
ती मुलगी आरडाओरडा करत होती रडत होती परंतु तिच्या मदतीला कोणीही आले नाही. आणखी भयानक म्हणजे ती ओरडू नये, म्हणून आरोपींनी या पीडितेला मारहाण देखील केली.

पीडित मुलीला कधी कमरेचा पट्टा तथा बेल्टने तर कधी लाकडी काठीने मारहाण केली. त्यानंतर तिला निर्वस्त्र करत उसाच्या शेतातून पळवत रस्त्यावर आणले. तरुण आणि त्याचे मित्र जणू काही राक्षस होते, रस्त्यावर ही घटना काही जण बघत होते त्या तरुणांना विरोध कोणी विरोध केला नाही, ही घटना होऊन तीन महिने झाले. मात्र या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

इतका अमानुष अत्याचार झाल्यानंतर ती बिचारी तरुणी भेदरून आणि घाबरून गेली हा अत्याचाराचा प्रकार तिने कोणालाही सांगितला नाही. घरातही देखील याची वाचता केली नाही, या उलट ते तरुण राजरोसपणे फिरत होते, आणखी भयानक प्रकार म्हणजे त्या तरुणांनी या संदर्भातील व्हिडिओ त्यावेळी तरुणीच्या बहिणीला पाठवला. हा व्हिडिओ बघून तिच्या बहिणीला मोठा धक्का बसला.

त्यानंतर तिच्या बहिणीने पीडितेला घटनेविषयी विचारपूस केली. तेव्हा घाबरलेल्या पीडितेने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. याप्रकरणी पीडित मुलीने कुटुंबीयांसोबत पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुख्य आरोपी जाहिद आणि त्याचे मित्र जावेद आणि आलम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. तर या घटनेचा व्हिडिओ मोबाइलमध्ये कैद करणारे दोन आरोपी सध्या फरार आहेत. पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत. या प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!