PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. ते आज मुख्यत्वे मुंबई आणि पालघर या दोन ठिकाणी भेट देणार होते. सकाळी बीकेसीत जिओला भेट दिल्यानंतर नरेंद्र मोदी पालघरला रवाना झाले. पालघर येथील वाढवन बंदराचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलत असताना पंतप्रधानांनी मालवण येथील राजकोट किल्ल्याबाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा कोसळल्या प्रकरणी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत भाष्य केले. टोल
PM Narendra Modi | मोदींचा भर सभेमध्ये माफीनामा
“आज या भूमिपूजनाच्या सोहळ्याप्रकरणी मला माझे मन मोकळे करायचे आहे. माझी निवड पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून झाली तेव्हा मी सर्वप्रथम रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपाशी बसलो होतो. मागच्या आठवड्यामध्ये सिंधुदुर्गमध्ये जे काही घडले ते फार दुर्दैवी आहे. मी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आराध्य दैवत आहेत. मी आज नमन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी डोके ठेवून माफी मागतो.” अस म्हणत माफि मागितली.
CM Eknath Shinde | ‘शिवरायांच्या चरणी मस्तक ठेऊन माफी मागतो पण…’; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आवाहन
विरोधकांना लावला टोला
सोबतच. “आमच्या वरती संस्कार वेगळे आहेत. भारताचे सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिवीगाळ करून, सावरकरांवर वेगवेगळ्या शब्दात टीका करून. माफी न मागणाऱ्यांपैकी आम्ही नाहीत. काहींना कोर्टात जाऊनही पश्चाताप होत नाही. असे लोक आम्ही नाही.” असं म्हणत विरोधकांना यावेळी चांगलाच टोला लगावला.
“मी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये आलो आहे. तेव्हा घडल्या प्रकाराबद्दल मी त्यांच्या पायावर माथा ठेवून माफी मागतो. त्याचबरोबर जे जे लोक छत्रपतींना आपलं आराध्य दैवत मानतात, त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अशा आराध्य दैवताची पूजा करणाऱ्या तमाम लोकांची मी मान खाली घालून माफी मागतोयं. आराध्य दैवत पेक्षा कोणीही मोठा नाही.” या शब्दात पंतप्रधानांनी भरसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम