PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. तेव्हा पंतप्रधानांच्या या दौऱ्यावेळी काँग्रेसकडून मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून विरोधी आंदोलन केले जाण्याची शक्यता होती. याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुरक्षा वाढवण्यात आली. तेव्हा काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी “पोलीस काँग्रेस कार्यकर्त्यांना डांबून ठेवता आहेत.” असे ट्विट करत गंभीर आरोप केले आहेत. यासंबंधीतील एक व्हिडिओ आपल्या ऑफिशियल ‘X’ (ट्विटर) हँडलवर गायकवाड यांनी पोस्ट केला आहे.
Nilesh Rane | राणेंच्या दाव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या; बघा नेमकं प्रकरण काय..?
Varsha Gaikwad | वर्षा गायकवाडांच नेमकं ट्विट काय?
“मुख्य दोषींना बाजूला ठेवून माझ्या घराबाहेर मोठा पोलीस फौजफाटा लावण्यात आलाय. काँग्रेस कार्यकर्त्यांना कारागृहात जेरबंद केला तरी बेहत्तर…. आम्ही मागे हटणार नाही…. महाराजांच्या स्वाभिमानासाठी आम्ही लढणार!” असं वर्षा गायकवाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Deola | छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे ‘मुक आंदोलन’
नेमकं प्रकरण काय?
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पंचधातूंचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण भलतच तापलेला दिसत आहे. तर आज पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून मुंबई आणि पालघर या दोन ठिकाणी त्यांचे कार्यक्रम होणार आहेत. मुंबईत बीकेसी जिओ मध्ये पंतप्रधानांचा खाजगी कार्यक्रम होईल तर त्यानंतर पालघर येथे पंतप्रधान मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचे उद्घाटन पार पडणार आहे. तेव्हा नुकत्याच मालवणी येथील घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर काँग्रेसकडून पंतप्रधानांच्या या दौऱ्यावेळी विरोधी आंदोलन केले जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या घराबाहेर पोलिसांकडून कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.
वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी घेतले ताब्यात?
आम्हाला ताब्यात घेण्यात आले, असा दावा काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. तर गायकवाड यांना ताब्यात घेण्यात आले नाही, त्यांना फक्त पोलिसांच्या गाडीतून आम्ही शिवाजी पार्कमध्ये नेत आहोत, असे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्याविरोधात आज गायकवाड यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. नंतर गायकवाड यांना स्थानबद्ध करण्यात आले होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम