Deola | छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे ‘मुक आंदोलन’

0
20
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळ्याची झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी असून, सदर दुर्घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी गुरुवार (दि.२९) ॲागस्ट रोजी सकाळी ११ वाजता देवळा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वतीने मुक आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी निवासी नायब तहसीलदार बबन अहिरराव यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, जिल्हा सरचिटणीस जगदीश पवार, नगरसेवक संतोष शिंदे, जि.प.चे माजी सदस्य यशवंत शिरसाठ, समता परिषदेचे मनोहर खैरणार, स्वप्नील आहेर, श्रावण आहेर, भावराव नवले, दादाजी गोसावी आदी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here