Viral Video : बुलढाण्यामधील काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी आज त्यांच्या फेसबुक अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्याने एकच खळबळ उडाली. या व्हिडिओमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची खाजगी कार एक पोलिस अधिकारी धुताना दिसतोय. त्यामुळे राज्यभरात या व्हिडिओची चर्चा होत आहे.
नुकतेच सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर पाहणी साठी गेलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि भाजप खासदार नारायण राणे व त्यांचे सुपुत्र निलेश राणे यांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा झाला यावेळी निलेश राणे पोलिसांवर संतापलेले दिसून आले. त्यांनी यावेळी पोलिसांवर आवाज चढवत अरेरावी केली. आश्चर्य म्हणजे या प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठलीही कठोर भूमिका घेतली नाही. त्यामुळे पोलीस खात्याचे मनोबळ खचत चालल्याचे दृश्य पाहायला मिळत होते. अशातच शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराची खाजगी कार पोलीस कर्मचारी धूत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
Viral Video | नेमका काय घडलं व्हायरल व्हिडिओमध्ये?
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या जयस्तंभ चौकातील कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्यूनरला एक पोलीस कर्मचारी धुत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या ऑफिशियल फेसबुक अकाउंट वरून शेअर केला गेला आहे तेव्हा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तयार केलेल्या पोलिसांचे काम आमदारांच्या गाड्यात धुणे आहे का? असा सवाल उपस्थित होतो. सध्या तरी सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून आमदारांनी याबाबत अजूनही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Narayan Rane | ‘नारायण राणेंपासून माझ्या जीवाला धोका!’; आमदाराच्या पत्राने खळबळ
गुन्हे राहू द्या, आधी गाड्या साफ करा?
सध्या राज्यभरात महिलांविरुद्ध होणाऱ्या अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. तसेच बुलढाण्यामध्ये अवैध धंदे दिवसेंदिवस वाढत असताना पोलिसांचे नेमके काम काय आणि ते काय करत आहेत. असा संतप्त सवाल सपकाळ यांनी विचारला आहे. “खाकी वर्दीवर लागलेला हा डाग” असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. ‘सदरक्षणाय खलनिग्रणाय’ हे ब्रीदवाक्य अंगावर घेऊन महाराष्ट्र पोलीस यंत्रणा जनतेच्या व स्त्रियांच्या सुरक्षेसाठी आहेत की आमदारांच्या गाड्या धुण्यासाठी? कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? महाराष्ट्र पोलीस शर्म करो! अशी संतप्त प्रतिक्रिया माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम