सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळी आहे. याचा जाहीर निषेध व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, तसेच पुतळ्याच्या बांधकामात हलगर्जीपणा केल्याबद्दल दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी देवळा येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवस्मारकाच्या पायऱ्यांवर बसून निषेध आंदोलन केले. यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसल्यामुळे या पुतळ्याच्या बांधकामाबाबत हलगर्जीपणा केल्याबद्दल केंद्र व राज्य सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येऊन, गुरुवारी (दि.२९) रोजी सपोनि दीपक पाटील यांना निवेदन सादर केले.
Deola | देवळा येथे महाविकास आघाडीच्या वतीने तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून ‘मूक आंदोलन’
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, मविप्रचे माजी संचालक डॉ. विश्राम निकम, सुनील आहेर, डॉ. संजय शिरसाठ, जितेंद्र आव्हाड युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, बाळासाहेब मगर, काँग्रेसचे दिलीप आहेर, शिवसेना (उबाठा गटाचे) ग्रामीण उपजिल्हा प्रमुख सुनील पवार, सह सपंर्कप्रमुख विजय जगताप, शहरप्रमुख विश्वनाथ गुंजाळ, तालुका संघटक प्रशांत शेवाळे, उप तालुकाप्रमुख विलास शिंदे, एस.के शिंदे, विजय आहेर, काकाजी देवरे, ज्ञानेश्वर देवरे, गोरख गांगुर्डे, गोविंदा सोनवणे, भाऊसाहेब आहेर, सतीश आहेर, खंडू जाधव आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम