Mahayuti Sarkar | शिंदेंच्या मंत्र्यांमुळे युती फुटणार..?; अजित पवारांना युतीतून बाहेर पडण्याचा सल्ला

0
57
#image_title

Mahayuti Sarkar : सध्या राज्यभरात आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सर्वच पक्षांकडून आपापले आमदार एकत्र करण्याचे काम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवरती आता शिंदे गटाच्या नेत्याकडून करण्यात आलेल्या एका वक्तव्यामुळे महायुतीत असलेली धुसमस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. परंतु निवडणुका तोंडावर असताना यामुळे महायुतीत फूट पडते की काय असा सवाल उपस्थित होऊ लागलाय.

Political News | ‘त्या’ आमदारांची काँगेसकडून हकालपट्टी; काँगेसमधून बाहेर पडताच ‘भाजपवासी’ होणार..?

Mahayuti Sarkar | कोणाच्या वक्तव्याने खळबळ उडाली? 

शिवसेना शिंदे गटाचे नेते आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षासंबंधित केलेल्या खळबळ जनक वक्तव्याने राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. “आपण हाडामासाचे शिवसैनिक आहोत. त्यामुळे आपले आयुष्यात कधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत पटलेले नाही. आत्ता जरी कॅबिनेटमध्ये राष्ट्रवादीसोबत मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यावर उलट्या होतात, आपल्याला त्यांची एलर्जी आहे. असं वक्तव्य केलेला तानाजी सावंतांच्या एका व्हिडिओने सध्या महायुतीला दणाणून सोडलं. नागरिकांशी संवाद साधतानाचा सावंतांचा हा व्हिडिओ आहे. ज्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जुळवून घेताना जड जात असल्याचे बोलून दाखवले. “आपण शिकत असल्यापासून शिवसेनेचे विचार आपल्या भिनलेले आहेत त्यामुळे आम्हाला राष्ट्रवादीचे एलर्जी आहे एखादी पुडी खाल्ल्यानंतर उलट्या होतात त्याप्रमाणे. आम्ही आमच्या तत्त्वांची बांधील आहोत.” असा देखील त्यांनी यावेळी व्हिडिओमध्ये म्हटल्याचे दिसून येते.

याप्रकरणी उमेश पाटलांनी काय म्हटले? 

“महायुती झाली म्हणून सावंत मंत्री झाले हे त्यांनी विसरू नये. तानाजी सावंत यांचे बोलणे ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेले बरे.” असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केले आहे.

PM Modi | पंतप्रधनांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँगेसचे खासदार स्थानबद्ध; काँग्रेसकडून गंभीर आरोप..?

सावंत यांच्या वक्तव्यामुळे मिटकरी ही संतापले

जे धरण फुटलं म्हणून खेकड्याला जबाबदार धरू शकतात, हाफकीन संस्थेला माणूस समजू शकतात, एवढेच काय तर बुम ता. परंडा जि. धाराशिव तिथल्या भैरवनाथ साखर कारखान्याचे पवार साहेबांच्या हस्ते उद्घाटन करून घेऊ शकतात ते अजितदादांकडून निधी घेऊन काहीही बोलू शकतात अशीच टीका करत अमोल मिटकरी यांनी आपला संताप व्यक्त केला.

सावंतांचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर तानाजी सावंत यांची अजून एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये सावंत धाराशिव लोकसभा बाबतीत बोलताना दिसत आहेत. “आपल्या मनाविरुद्ध तिकीट गेलं. ज्यांना आपण मतदान करत नाही त्यांना तिकीट दिलं गेलं. म्हणून मी तुम्हाला मतदान करा असं सांगायला आलो नाही. कारण ते आपल्यालाच पटलं नव्हतं” या क्लिपमध्ये देखील त्यांनी राष्ट्रवादी विरोधात वक्तव्य केल्याचे दिसून येते. त्यावरून अशी वक्तव्य करण्याची ही त्यांची पहिली वेळ नसून महायुतीत असलेली पक्षांतर्गत नाराजी या प्रकरणातून पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली पाहायला मिळते. तसेच तानाजी सावंत यांची ही क्लिप नेमकी कधीची आहे कधीची आहे तसेच या व्हिडिओच्या सत्यतेबद्दलही ठोस माहिती नाही. त्यामुळे ‘द पॉइंट नाऊ’ याची पुष्टी करत नाही.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here