सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांप्रमाणे संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते. संत सेना महाराजांचे अभंग मोठ्या आवडीने आजतागायत गायले जातात. तालुक्यात नाभिक समाजाबरोबरच सोनार, शिंपी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. महाराजांच्या जयंती, पुण्यतिथीसारखे कार्यक्रम समाजबांधव मोठ्या उत्साहात साजरे करतात. मात्र, त्यांना जागेअभावी या कार्यक्रमासाठी होणारी समस्या लक्षात घेता लवकरच सभागृहाची उभारणी करून देण्याचा आपला मानस असल्याचे प्रतिपादन भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर यांनी आज देवळा येथे केले. संत सेना महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
देवळा शहरात शुक्रवारी (दि.३०) रोजी नाभिक समाजाच्या वतीने संत सेना महाराजांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केदा आहेर हे उपस्थित होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हाध्य्क्ष शंकर , उपनगराध्यक्ष मनोज आहेर, नगरसेवक जितेंद्र आहेर, माजी उपनगरध्यक्ष अतुल पवार, योगेश (नानू) आहेर, राजेंद्र वडनेरे, बळवंत शिंपी आदी उपस्थित होते. देवळा शहरात नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
Deola | केदा आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त न्हनावे येथे विद्यार्थ्यांना सायकल वाटप
यावेळी सकाळी महाराजांच्या मुर्तीचा विधिवत पुजा करून अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने सत्यनाराण महापुजा करण्यात आली. सकाळी देवळा शहरातून टाळ मृदूंगाच्या गजरात भव्य दिव्य मिरवणुक काढण्यात आली. याप्रसंगी नाफेडचे राज्य संचालक केदा आहेर यांच्या हस्ते उपस्थित समाज बांधवाना संत सेना महाराजांच्या प्रतिमांचे वाटप करण्यात आले. तसेच आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त नाभिक समाज बांधवांकडून सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील १० वी १२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. कार्यक्रमानंतर महाप्रसाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विलास निकम, दावल भदाणे, तात्याभाऊ भदाणे, नाना हिरे, नाना निकम, पोपट भदाणे, पप्पू सोनवणे, राजू वेळीज, आप्पा निकम, मनोज निकम आदींसह देवळा शहर व तालुक्यातील नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम