CM Eknath Shinde : सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर असलेला शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा दोन दिवसांपूर्वी कोसळला अन् महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या. याप्रकरणी महायुती सरकारमधील घटक पक्षात असलेले राष्ट्रवादीचे नेते अन् उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यापूर्वीच माफी मागितली आहे. तेव्हा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही याप्रकरणी माफी मागितली असून “याचे राजकारण करू नका लवकरात लवकर भव्य पुतळा उभारला जाईल. त्यासाठी पाठपुरावा करा.” असे म्हणत जनतेला आणि विरोधकांना आवाहन केले आहे.
Viral Video | शिंदेंच्या आमदारांची मुजोरी..?; पोलिसांना धुवायला लावताय गाड्या
“बघायला गेले तर राजकारण करायला अनेक विषय आहेत. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आपणा सर्वांची अस्मिता आहेत. ते आपले दैवत आहेत. तेव्हा कृपा करून त्यांच्यावर तरी राजकारण करू नका, मी त्यांच्या चरणाशी डोके ठेवून एकदा नाहीतर शंभर वेळा माफी मागतो. त्यांचा आदर्श ठेवूनच आम्ही राज्याचा कारभार सांभाळत आहोत. मी कायमच त्यांच्यासमोर नतमस्तक होतो.” असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घडल्या प्रकाराबाबत प्रतिक्रिया देत सर्वांची माफी मागितली. त्याबरोबरच “छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोधकांना या प्रकरणात राजकारण न आणण्याची सद्बुती द्यावी.” असं म्हणत प्रकरणावर होत असलेले राजकारण थांबावे यासाठी आवाहन केले.
CM Eknath Shinde | लवकरात लवकर भव्य पुतळा उभारणार
छत्रपतींचा पुतळा लवकरात लवकर कसा उभा राहील हे विरोधकांना सांगितले पाहिजे. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसर सुरक्षित करण्याची मागणी केली आहे. नौदलाकडून लवकरात लवकर त्या ठिकाणी काम सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली. बुधवारी या प्रकरणी बैठक पार पडली असून त्यासाठी दोन समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आयआयटी इंजिनियर, नौदलाचे अधिकारी आणि इतर लोकं असणार आहेत. तेव्हा त्या ठिकाणी लवकरात लवकर भव्य पुतळा उभारण्याचे काम सुरू केले जाणार आहे.
घटनेनंतर महायुतीतील घटकपक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांनी ‘मालवण मधील घटना अत्यंत दुर्दैवी आहे’, असं म्हणत त्याबद्दल जाहीर माफी मागितली होती. त्यावर भाष्य करत “शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप आम्ही तिन्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत. आम्हा तिघांसाठीही शिवाजी महाराज अस्मितेचा विषय आहेत. त्यात कोणीही राजकारण मध्ये आणू पाहत नाहीये. तेव्हा इतरांनीही याबाबतीत राजकारण करू नये व शिवाजी महाराजांचा पुतळा कसा उभा राहील यासाठी प्रयत्न करावे.” असे देखील ते यावेळी म्हणाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम