Rajkot Fort Incident | आपला माणूस पडला, महाराजांपुढे पैशांचे काय मोल?; मच्छीमारांच्या कृतीने राजकारण्यांची बोलती बंद

0
38
#image_title

Rajkot Fort Incident : मागच्या वर्षी नौदल दिनी सिंधुदुर्गातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पंचधातूंचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींमध्ये संतापाची एकच लाट उसळली. या घटनेवरून मालवणमध्ये जो काही राडा झाला तो राज्यानेच नाही, तर संपूर्ण देशाने पाहिला. या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्राचा राजकारण तापलेला दिसतंय. यावेळी पुतळा पडल्यानंतर सभोवतालच्या परिसरात असलेल्या मच्छीमारांनी केलेल्या कृतीने तपासणी करता गेलेल्या अधिकाऱ्यांना ही भारावून सोडले.

Deola | छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे ‘मुक आंदोलन’

नौदल दिनानिमित्त चार डिसेंबर 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. त्यानंतर आठ महिन्यांच्या कालावधीतच हा पुतळा कोसळला. त्यावरून सर्वसामान्य जनता आणि शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. आता राज्य सरकारकडून हे प्रकरण संवेदनशीलरित्या हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. या घटनेप्रकरणी पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटे आणि सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे विरोधकांनी मात्र या मुद्द्यावरून महाराष्ट्राचं राजकारण दणाणून सोडलंय. या मुद्द्याला घेऊन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांमध्ये मालवण येथे झालेला ड्रामा सर्वांनीच पाहिला. मात्र जनतेला या मुद्द्यावर राजकारणापेक्षा निष्पक्ष चौकशी आणि दोषींना शिक्षा एवढीच अपेक्षा आहे.

Rajkot Fort Rada | भांडणं नेत्यांची, तक्रार समर्थकांवर; राजकोट किल्ल्यावरील राड्याप्रकरणी गुन्हे दाखल

Rajok Fort Incident | मच्छीमारांच्या कृतीने अधिकारी भारावले

“पुतळा पडल्याची घटना डोळ्यादेखतच घडली आणि पुतळा नव्हे तर आपल्या घरातला माणूस पडला असे वाटले. तेव्हा माझ्या बोटी झाकण्यासाठी आणलेली ताडपत्री पुतळ्याचा चबुतरा झाकण्यासाठी मी सहज देऊ केली. अशी प्रतिक्रिया स्थानिक मच्छिमार सुनील खंदारे यांनी दिली. पुतळा पडला तेव्हा बोटी झाकण्यासाठी खरेदी केलेल्या 40 हजारांच्या ताडपत्रीला त्यांनी कसलाही विचार न करता देऊ केले.

महाराजांसमोर पैशाचे काय मोल? 

पुतळा पडल्यानंतर स्थानिक मच्छीमार सुनील खंदारे यांनी सरकारही यंत्रणेची वाट न बघता तातडीने ताडपत्री आणली व पुतळा झाकला. त्यानंतर सरकारी अधिकारी जेव्हा तेथे दाखल झाले तेव्हा त्यांची ही कृती पाहून ते देखील भारावून गेले. त्यांनी ताडपत्री चे किती पैसे द्यायचे अशी विचारणा केली असता छत्रपती शिवाजी महाराजांपुढे पैशांचे मोल तरी काय? असा सवाल केला. अन् अधिकाऱ्यांच्या अंगावर शहारे आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजकोट किल्ल्यावर बसवल्यापासून त्याचे वेल्डिंग कमकुवत असल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here