Rajkot Fort Rada : सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यात समुद्रकिनारी असलेल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पंचधातूंचा पुतळा कोसळला त्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ माजली. या घटनेला सर्वत्र निषेध दर्शवण्यात आला. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीकडून मालवणातील राजकोट किल्ल्याला भेट देण्यात आली. या पाहणी करता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे मविआतील इतर नेत्यांसोबत मालवण येथे दाखल झाले असता तिथे उपस्थित भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या समर्थकांमध्ये आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. सदर प्रकरण पोलिसांकडून वेळेत शांत करण्यात आले. याच घटनेप्रकरणी आता राणे समर्थक व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांतील 42 जणांसह 150 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली आहे.
Sushma Andhare | ‘चार आणे, बार आणे अटक करा नारायण राणे’; राणेंच्या अटकेसाठी विरोधक आक्रमक
कोणत्या निकषांवर गुन्हे दाखल करण्यात आले?
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये झालेल्या राड्यांमध्ये संभाजी पाटील व मेहेक परब हे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यासोबतच अनेक कार्यकर्तेही जखमी झाले आहेत. त्यामुळे सदर प्रकरणी शासकीय कामात अडथळा, लोकसेवकांना त्यांच्या कामात धाक दाखवून परावृत्त करणे, गर्दी, जिल्ह्यामध्ये घोषित केलेल्या मनाईच्या आदेशाचा भंग, मारामारी, घोषणाबाजी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे. अशा विविध कलमांतर्गत दंगा करणाऱ्या दोन्ही गटातील 42 जणांसह 150 अनोळखी जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खोडे हे अधिक तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम