Narayan Rane | ‘नारायण राणेंपासून माझ्या जीवाला धोका!’; आमदाराच्या पत्राने खळबळ

0
42

Narayan Rane : छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग मालवण येथील पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचे नव वळण घेतलं. घटने संबंधित संपूर्ण महाराष्ट्रातून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर विरोधकांकडूनही या घटनेप्रकरणे निषेध वर्तवण्यात आला. याचप्रकारे काल बुधवार, 28 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या युवासेना प्रमुखांसह दोन्ही विरोधी पक्षनेते राजकोट येथे किल्ल्याची पाहणी करता गेले असता तिथे उपस्थित असलेल्या भाजप खासदार नारायण राणे यांच्या समर्थकांकडून गोंधळ घालण्यात आला. ज्यामध्ये स्वतः नारायण राणे यांनी पोलिसांसमोर “रात्रभर घरात घुसून खेचून मारून टाकेन.” अशी धमकी दिली. राणेंच्या या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक यांना नारायण राणेंवर गुन्हा दाखल करण्याचे निवेदन केले आहे.

Sushma Andhare | ‘चार आणे, बार आणे अटक करा नारायण राणे’; राणेंच्या अटकेसाठी विरोधक आक्रमक

Narayan Rane | नेमके काय म्हणाले वैभव नाईक

नारायण राणे यांनी राजकोट किल्ल्यावर घडलेल्या घटना प्रकरणी उघड उघड मारून टाकण्याची धमकी दिली आहे. त्याचबरोबर याआधी सुद्धा कै. श्रीधर नाईक यांची राजकीय वैमानस्यातून हत्या करण्यात आली होती. श्रीधर नाईक हे माझे काका होते. त्यांच्या हत्येमध्ये नारायण राणे हे 13वे आरोपी होते. तेव्हा त्यांच्या या गुन्हेगारी पार्श्वभूमीला लक्षात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. असे निवेद वैभव नाईकांनी केले आहे.

Aditya Thackeray | “ठाकरेंचं ‘पवार स्टाईल’ भाषण; मिंधे, चींधीचोर, बालिश म्हणत डिवचलं

“मी वैभव नाईक वय वर्ष 48. रा. बिजलीनगर कणकवली, गुरुवार दिनांक 28/08/2024 रोजी मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करता गेलो असताना त्या ठिकाणी उपस्थित खासदार नारायण राणे व त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला आणि मला व माझ्या सहकाऱ्यांना “एकेकाला रात्रभर घरात घुसून मारून टाकेन.” अशी धमकी दिली. माझ्या काकांची म्हणजेच कै. श्रीधर नाईक यांची हत्या राजकीय वैमनस्यातून करण्यात आली होती. ज्यामध्ये नारायण राणे हे 13वे आरोपी होते. तेव्हा त्यांची हि गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा. अशी मागणी.” असे निवेदन वैभव नाईकांनी केले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here