Skip to content

PM Modi | नाशिक प्रशासनाचा प्रताप; मोदींना गरीबी दिसू नये म्हणून, गरिबांना झाकले..

PM Modi

PM Modi |  १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर आले होते. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने रात्रीतून सगळे शहर चकाचक केले होते. शहरात रंगरंगोटी, साफसफाई, विद्युत रोशनाई अशी जय्यत तयारी करण्यात आली होती. एवढेच नाहीतर, मोदींच्या शक्ति प्रदर्शनासाठीही मोठा तामझाम करण्यात आला होता. मात्र, मोदींना गरीबी दिसू नये, म्हणून गरिबांची घरं ही थेट पांढऱ्या कपड्याने झाकल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रताप आता समोर आला आहे.(PM Modi)

काळाराम मंदिराजवळ राहणाऱ्या गरिबांच्या गरीबीचे दर्शन मोदींना होऊ नये यासाठी प्रशासनाने काळाराम मंदिराजवळच्या एका चाळीत राहणाऱ्या लोकांची घरे ही पांढऱ्या कपड्याने झाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिककरांना मोदींचे दर्शन व्हावे यासाठी त्यांच्या रोड शो आणि भव्य सभेवर कोटींमध्ये  रुपये उधळण्यात आले. मात्र, मोदींना गरिबांचे आणि त्यांच्या घरांचे दर्शन होऊ नये म्हणून केलेली ही अत्यंत लाजिरवाणी बाब असून, यामुळे आता नाशिककरांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

PM Modi in Nashik | आई बहिनींवरून शिवीगाळ करू नका – पं. मोदी

मुख्यमंत्र्यांचे आदेश…  

१२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी हे नाशिकमध्ये दाखल झाले होते. तब्बल ५ वर्षांनी नाशिकमध्ये येत असलेल्या मोदींच्या स्वागतासाठी फक्त दोन दिवसांत नाशिकच्या स्थानिक यंत्रणांनी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी नशिकचे रूप पालटवून टाकले. मोदींच्या या चार तासांच्या दौऱ्यात मोदींनी आधी काळाराम मंदिरात आरती केली. गोदाकाठाची पाहणी केली. यानंतर त्यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

मोदींच्या या दौऱ्याच्या एक दिवस आधीच पाहिणीसाठी स्वतः मुख्यमंत्री नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी जणू ‘मोदी उत्सवा’साठी संपूर्ण शहर सजवून टाकण्याचे आदेशच प्रशासनाला दिले होते. याची खबरदारी घेत प्रशासनाने शहर सजवले आणि जे सजवता नाही आले ते थेट झाकून टाकले.(PM Modi)

PM Modi in Nashik | मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, देवळ्यातील आंदोलक ताब्यात

PM Modi | नेमकं प्रकरण काय..?

काळाराम मंदिरात दर्शनासाठी जाताना मोदींच्या ताफ्याच्या रस्त्यावर ही पडकी घरे असून, ही घरे मोदींना दिसू नये यासाठी पडक्या घरांवर पांढरे कापड टाकण्यात आले होते. यामुळे दौरा होईपर्यंत दीड तास या नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही, अशी चोख व्यवस्था प्रशासनाने केलेली होती. मात्र, प्रशासनाच्या या केविलवाण्या आणि असंवेदनशील प्रकारामुळे नाशिकच्या जनतेकडून रोष व्यक्त केला जात आहे. (PM Modi)

नाशिककरांना मोदी दिसावे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींसह नेत्यांना शक्तिप्रदर्शन करता यावे. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून ‘रोड शो’चा थाट घालण्यात आला होता. तर दुसरीकडे मोदींच्या रोड शो आणि सभेसाठी गर्दी जमविण्याची जबाबदरी भाजप पदाधिकारी आणि यंत्रणांवर होती. यासाठी घरोघरी जावून त्यांनी नागरिकांना सभास्थळी जमवले. मात्र, याचवेळी हा गरीबी झाकण्याचा प्रताप यंत्रणांनी केल्यामुळे या शानदार कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. (PM Modi)

(सौजन्य – महाराष्ट्र टाईम्स वृत्तसेवा)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!