Skip to content

Onion Export Ban | ज्यांनी केली निर्यात बंदी; त्यांनाच करा मतदान बंदी!


(Onion Export Ban) सोमनाथ जगताप – देवळा | या देशात शेतकरी जोपर्यंत निवडणुकांचा मुद्दा होत नाही तोपर्यंत अशीच बळिराजाची लूट सुरूच राहणार असल्याचे परखड मत प्रहारचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी शनिवारी रोजी देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील दत्तमंदिरासमोरील प्रांगणात आयोजित सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले.

PM Modi | नाशिक प्रशासनाचा प्रताप; मोदींना गरीबी दिसू नये म्हणून, गरिबांना झाकले..

विठेवाडी येथील शिवभक्त तरुणांनी एकत्र येत गणेश निंबाळकर यांना हरित क्रांतीचे जनक डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मानाचा कृषीरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निंबाळकर म्हणाले की, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत शेतकऱ्यांनी आपल्या मतदानाचा दबाव निर्माण करायला हवा त्यासाठी. ज्यांनी केली कांदा, सोयाबीनवर निर्यातबंदी त्यांनाच आता मतदान बंदी करण्याचे आवाहन करण्यात आले. विठेवाडी, सावकी खामखेडा येथे तरूण कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर बोलताना त्यांनी आवाहन केले आहे.

Onion Export Ban |जिल्हाअध्यक्ष गणेश निंबाळकर यांचा सत्कार

विठेवाडी येथील दत्त मंदिरात त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विठेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव, तसेच गावातील राजा शिवछत्रपती तरुण मंडळातर्फे जिल्हाअध्यक्ष गणेश निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी सांगितले की, राज्य आणि केंद्रातील दोन्ही सरकार ही पिकविणाऱ्या पेक्षा खाणाऱ्यांचा ज्यास्त विचार करून निर्णय घेत आहे, निर्यात बंदीसारख्या शेतकरी विरोधी निर्णयाला विरोध केला म्हणून सर्वच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले गेले, येणाऱ्या निवडणुकीत सर्व शेतकरऱ्यांनी एकजुट दाखवून विरोध केला पाहिजे.

Dada Bhuse | कुणी गल्लीत विचारत नाही अन् बाता मात्र…; भुसेंनी राऊतांना फटकारले

यावेळी गावातील प्रगतीशील शेतकरी पि. डी. निकम, प्रहारचे युवा जिल्हाध्यक्ष बापू देवरे, शंकर निकम, महेंद्र आहेर, माणिक निकम, बबलू निकम, नरेंद्र निकम, तानाजी निकम, प्रविण निकम, संजय सावळे, कैलास कोकरे, धनंजय निकम, स्वप्निल निकम, पपु महाराज, ईश्वर निकम, ललित निकम, आणा् शिवाजी, मिलिंद निकम, गोरख निकम यांच्यासह विकास सोसायटी, ग्रामपंचायतीचे सदस्य, तरुण शेतकरी व प्रहार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रगतीशील शेतकरी संजय निकम यांनी केले तर आभार कुबेर जाधव यांनी मानले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!