Skip to content

Dada Bhuse | कुणी गल्लीत विचारत नाही अन् बाता मात्र…; भुसेंनी राऊतांना फटकारले

Dada Bhuse

Dada Bhuse | आज नाशिक येथे ‘महायुती जिल्हा स्तरीय कार्यकर्ता’ मेळावा संपन्न झाला. यावेळी जिल्हाभरातील तिन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उमेदवार आहेत. तसेच प्रत्येक कार्यकर्ता हा उमेदवार आहे, असे समजून कामाला लागण्याच्या सूचना यावेळी नाशिकचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.(Dada Bhuse)

येणाऱ्या काळात नाशिक हे कायम कसे स्वच्छ राहील?. यासाठी प्रयत्नशील राहून प्रत्येकाने आपले कर्तव्य म्हणून ही स्वच्छतेची जबाबदारी घ्या. आपापसातील मतभेद विसरून कामाला लागा, महायुती हा आपला ब्रँड असणार आहे. हे प्रत्येकाने लक्षात असुद्या. जगात भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. यामुळे मोदी हे भारताचा सन्मान असून, मोदी साहेबांमुळे आपण स्वाभिमानाने आज जगभरात वावरत आहोत. जनतेत जाताना सरकारने केलेले कार्यही त्यांच्यापर्यंत पोहचवा, शेतकऱ्यांसाठी देखील खूप चांगले निर्णय सरकारने घेतले आहेत. त्याचा प्रचार प्रसार करण्याचे आवाहन यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दादा भुसे यांनी केले.(Dada Bhuse)

Dada Bhuse | चुकीचं वक्तव्य केलं तर…; भुसेंचा राऊतांना इशारा 

राष्ट्रीय युवा महोत्सव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमित्त देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या सर्वांनी चोखपणे पार पडल्या. त्याबद्दल उपस्थित पदाधिकाऱ्यांचे त्यांनी आभारही मानले. तसेच पुढे ते म्हणाले की, “मोदीजींना आपल्याला पुन्हा पंतप्रधान करायचे आहे आणि यासाठी आपण स्वतः उमेदवार आहोत असे समजूनच सर्वांनी काम करावे. तसेच जी जबाबदारी आपल्यावर पक्ष सोपवेन ती आपण पार पाडू”. असे पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना ते म्हटले.(Dada Bhuse)

Dada Bhuse| दादा भुसेंनी धाडली सुषमा अंधारेंना नोटिस…

अरे तुम्हाला गल्लीत तरी कोणी विचारते का ?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही भुसेंनी यावेळी टिका केली ते म्हणाले की,”काही लोक रोज सकाळी  ८- ९ ला उठले की टिव्ही समोर येणार वाकडी मान करणार, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलणार. अरे तुम्हाला गल्लीत तरी कोणी विचारते का ? तुम्ही आजपर्यंत कोणाचे रेशन कार्ड तरी काढून दिले आहे का ?. टिव्हीवर फक्त चमकोगिरी करणार, आता यांच्याकडेआपण दुर्लक्ष करायला पाहीजे. असही बोचरी टिका खासदार संजय राऊत यांच्यावर मंत्री दादा भूसेंनी केली.

Dada Bhuse | प्रकाश लोंढेंना प्रत्युत्तर 

रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी केलेल्या टिकेलाही यावेळी मंत्री दादा भुसेंनी प्रत्युत्तर दिले आहे. ” लोंढे साहेब काही घरातल्या गोष्टी आपण घरातच बोलू शकतो. आठवले साहेब मोदीजींचे आवडते नेते आहेत, त्यांना बोलावून मंत्रिपद दिले जाते. आपल्यात जर काही असेल तर ते आपण बोलून मिटवून घेऊ. मोदी साहेबांच्या समोर कोणी आहे का? असे यावेळी दादा भुसे म्हणाले.(Dada Bhuse)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!