Skip to content

Dada Bhuse| दादा भुसेंनी धाडली सुषमा अंधारेंना नोटिस…


Dada Bhuse|   उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनंतर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनाही राज्याचे मंत्री दादा भुसे यांच्याकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. वेगवेगळ्या वृत्तपत्रांचा दाखला देत नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणी मंत्री दादा भुसे यांची बदनामी केल्याबाबत वकीलांमार्फत सुषमा अंधारे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे ड्रग्स प्रकरणात मंत्री दादा भुसे यांचे नाव रोवणे सुषमा अंधारे यांना चांगलेच महागात पडण्याची चिन्हे दिसत आहेत.

 काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणात काही नेत्यांचा हस्तक्षेप असल्याचे आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, सुरवातीला सुषमा अंधारे यांनी मंत्री दादा भुसेंवर थेट आरोप केला होता. आणि त्यावेळी दादा भुसे यांनीही कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पुन्हा खासदार संजय राऊत यांनी दादा भुसे यांच्याकडे बोट दाखवत ड्रग्ज प्रकरणात हात असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे दादा भुसे यांनीही संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले होते. तर संजय राऊत यांनी बदनामी केली म्हणून दादा भुसे यांनी मालेगाव कोर्टात खटलादेखील दाखल केला होता. त्या संदर्भात राऊत यांना कोर्टाची नोटीसही पाठवण्यात आली होती. तर आता ड्रग्ज प्रकरणात दादा भुसे यांचे नाव घेतल्या प्रकरणी सुषमा अंधारे यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे.

ठाकरे – शिंदे यांच्यात आज शाब्दिक युद्ध…!

काही दिवसांआधी सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन दादा भुसेंसह शंभूराज देसाई यांचा ड्रग्ज प्रकरणात हात असल्याचे आरोप केले होते. त्यांच्या चौकशीसह नार्को टेस्ट करा, असेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर दादा भुसे यांनी यावर प्रत्युत्तर देत “आपला कोणताही संबंध नाही. काय चौकशी करायची ती करा”. आमची तयारी असल्याचे ते म्हणाले होते. त्यानंतर आता मंत्री दादा भुसे यांच्याकडून सुषमा अंधारे यांना थेट कोर्टाची नोटीस पाठविल्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ड्रग्ज प्रकरणात बदनामी व आरोप केल्याप्रकरणी पुरावे द्या. नाहीतर माफी मागा, असा ह्या नोटीसमध्ये स्पष्ट उल्लेख आहे.

 काय आहे नोटिस..?

नाशिकच्या ललित पाटील ड्रग्स प्रकरणात मंत्री भुसे यांच्यावर सुषमा अंधारे यांनी आरोप केला होता. दरम्यान, आता दादा भुसे यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रांचा दाखला देत भुसे यांची बदनामी केल्याबाबत सुषमा अंधारे यांना नोटीस बजावली आहे. बदनामी केल्याप्रकरणी पुरावे द्या नाहीतर माफी मागा, असा नोटीस मध्ये उल्लेख करण्यात आला आहे. तसेच नोटीसला उत्तर दिल नाहीतर मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा देखील  देण्यात आला आहे.

Deola| नाशिकचे ड्रग्स देवळ्याच्या गिरणा नदीत… पहाटे पासून मुंबई पोलिसांची चौकशी सुरू…


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!