Deola| नाशिकचे ड्रग्स देवळ्याच्या गिरणा नदीत… पहाटे पासून मुंबई पोलिसांची चौकशी सुरू…

0
3

Deola| नाशिकच्या शिंदे गावातील ड्रग्स कारखाण्यात सापडलेल्या तीनशे कोटी किंमतीच्या ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे देवळा तालुक्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत.  सोमवारी (दि.२३) रोजी मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी ड्रग्जमाफिया ललित पाटीलचा वाहनचालक सचिन वाघ याला
अटक केली. व त्याच्या चौकशी दरम्यान त्याने देवळा तालुक्यातील सरस्वती वाडी येथे ड्रग्ज लपवल्याची कबुली दिली होती.

दरम्यान, लोहोणेर येथील गिरणा नदी पत्रात ड्रग्ज नष्ट केल्याचे सांगितले होते. काल साकीनाका पोलिसांनी सरस्वती वाडी (ता.देवळा)  येथे धाड टाकून ललित पाटीलचा वाहनचालक सचिन वाघ याच्या नातेवाईकांकडून काही प्रमाणात ड्रग्स हस्तगत केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान ह्या प्रकरणी पुन्हा एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान आज पहाटे साडे तीन वाजेपासून गिरणा नदीच्या पात्रात रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. तरी सकाळी १० वाजेपर्यंत त्यांना गिरणा नदी पात्रात कथित नष्ट केलेला माल सापडला नाही. दरम्यान, स्थानिक पोलिसांच्या मदतीने साकीनाका पोलीस पथक हे तालुक्यात कसून चौकशी करीत आहे .

Horoscope Today 24 October: विजयादशमीच्या दिवशी कोणत्या राशींना लाभ होईल, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

ललित पाटीलचा चालक सचिन वाघ हा देवळा तालुक्यातील वाखारी पिंपळगाव येथील असल्याचे माहिती आहे. तर, सरस्वतीवाडी येथील संशयित आरोपी हा वाघ याचा नातेवाईक असल्याचे सांगण्यात आले आहे . दरम्यान, साकीनाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील व सहकारी पोलीस तसेच अंमलदार पुढील तपास करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच देवळा तालुक्यातील स्थानिक नागरिकांनी अगदी पहाटेपासूनच गर्दी केल्याने पुलावर दोन्ही बाजूला वाहनांची मोठी रांग लागली होती .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here