चांदवड | नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात एका ट्रकने कट मारल्याने एका भाविकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. हा भाविक चांडवडची देवी रेणुका मातेचे दर्शन घेऊन दुचाकीवर येत असताना हा अपघात झाला आहे. या भयावह अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे. ‘प्रल्हाद दत्तू पवार’ असे मृत भाविकाचे नाव आहे.
नाशिकच्या चांदवड येथे रेणुका मातेचे दर्शन घेऊन दुचाकीवर परतत असताना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर ट्रकने कट मारल्याने एका भाविकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे तर ट्रक चालक हा फरार झाला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम