Dada Bhuse | संजय राऊत यांना बोलून काहीही फायदा नाही आहे. दररोज काही तरी वायफळ वक्तव्य करणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकारच आहे. त्यांनी काहीही चुकीचे वक्तव्य केले तर, आपण न्यायालयात दाद मागूच असं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी नाशिकमध्ये म्हटलं आहे.
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादाजी भुसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्याविरुद्ध मालेगाव येथे अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलेला आहे. दरम्यान, या प्रकरणी जामिना मिळावा यासाठी खासदार संजय राऊत हे शनिवार (दि.२ डिसेंबर) रोजी मालेगाव येथील न्यायालयात हजर होणार आहेत. दरम्यान, नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शनदेखील केले जाईल. अशातच दुसरीकडे दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधलेला आहे. (Dada Bhuse)
दरम्यान, यावेळी मंत्री दादा भुसे यांनी इतरदेखील अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफ करणे हा चांगला विषय आहे. पण आर्थिक बाबीचे सोंग हे कोणाचेही सरकार असू देत, ते आणू शकत नाही. असं म्हणत दादा भुसेंनी जयंत पाटलांच्या मागणीवरही यावेळी भाष्य केले आहे.
Crime news | शेजारचं दुकान भाड्याने घेतलं, भिंत फोडत ज्वेलरचं दुकान लुटलं
त्यांना बोलून काय फायदा
खासदार संजय राऊत यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. त्याचं उत्तरही मी सभागृहात दिलेलं होतं. त्यांच्याविरोधात मी मालेगाव न्यायालयात दावा देखील दाखल केलेला आहे. ते आता त्या दाव्यावर अटकपूर्व जामिनासाठी जात आहेत. त्यांना बोलून असंही काहीही फायदा नाहीये. दररोज काहीतरी वक्तव्य करणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकारच आहे. मात्र, जर त्यांनी काही चुकीचं वक्तव्य केलं तर, आम्हीदेखील न्यायालयात दाद मागूच, अशी प्रतिक्रिया आज नाशिक येथे मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे.(sanjay raut)
आर्थिक बाबींचे सोंग आणू शकत नाही
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, अशी मागणी केली आहे. यावर देखील मंत्री दादाजी भुसे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. सरसकट सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे हा विषय चांगलाच आहे. पण, आर्थिक बाबीचे सोंग हे सरकार कोणाचेही असो ते आणता येत नाही. जयंत पाटील यांनी वित्तमंत्री या पासून अनेक जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. शेतकऱ्यांना मदत प्रकरणी कॅबिनेटमध्ये चर्चा झालेली आहे. पंचनाम्यांची कामं ही प्रगतीपथावर आहेत, असंही यावेळी दादा भुसे यांनी म्हटलं आहे. (Dada Bhuse)
Nashik Crime | मुल्हेर येथे ९ लाखांचा गुटखा हस्तगत
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम