Skip to content

Nashik Crime | मुल्हेर येथे ९ लाखांचा गुटखा हस्तगत


 Nashik Crime |   जिल्ह्यात गुजरातहून महाराष्ट्रात चोरट्यामार्गाने आलेला आठ लाख अठ्ठ्यात्तर हजार पाचशे ऐंशी (८,७८,५८०) रुपयांचा गुटखा हा जायखेडा येथील पोलिस पथकाकडून ताहाराबाद-सटाणा ह्या रस्त्यावरील मुल्हेर चौफुली ह्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेला आहे. दरम्यान, ह्या गुटख्याची चोरटी वाहतूक करत असल्याची गुप्त बातमी ही सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना मिळालेली होती.(Nashik Crime)

त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचत मारोती कंपनीची (एमएच ४१/ एम २३६५) ब्रिझा ही संशयित गाडी थांबवून तपासली असताना, त्यात त्यांना पानमसाला तसेच गुटखा भरलेले अनेक पोते आढळून आले होते.

दरम्यान, याप्रकरणी पलिसांनी शाहरुख रफिक तांबोळी (वय २८) राहणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, ता. सटाणा ह्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आसिफ शबीर तांबोळी (रा. सटाणा) हा संशयित फरार असून पोलिस त्याच्या मागावर असून, त्याचा शोध घेत आहे.(Nashik Crime)

Farmers Dron Scheme | केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी योजना; शेतकऱ्यांना देणार ड्रोन

तसेच या कारवाईमध्ये गुजरातहून महाराष्ट्रात चोरट्यामार्गाने आलेला ८ लाख ७८ हजार ५८० रुपये इतक्या किंमतीचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे.

दरम्यान, ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, तसेच अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जायखेडा येथील पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट आणि त्यांचे सहकारी पोलिस उपनिरीक्षक वाघमारे, पोलिस सुनील पाटील, पोलिस नाईक भगरे यांनी केलेली आहे.(Nashik Crime)

चांदवड मध्येही ८० लाखांचा गुटखा जप्त 

नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात काही दिवसांपूर्वीच ५० लाख आठ हजार, पाचशे रुपये इतक्या किंमतीचा गुटखा तसेच पानमसाला हा चांदवड पोलिसांकडून हस्तगत करण्यात आलेला आहे. त्यासोबतच २० लाख किंमतीचा ट्रकदेखील पोलिसांकडून जप्त करण्यात आलेला आहे. दरम्यान, या प्रकरणी हस्तगत करण्यात आलेला असा एकूण ७० लाख आठ हजार पाचशे रुपये किंमतीचा असून, हा मुद्देमाल चांदवड पोलिसांकडून हस्तगत करण्यात आलेला आहे.

दरम्यान, हा गुटखा विक्रीसाठी मध्य प्रदेश येथून मुंबईच्या दिशेने जात असल्याची गोपनीय माहिती ही चांदवड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, चांदवड येथील स्थानिक पोलिसांच्या सहाय्याने विशेष पथकाने ही धडाकेबाज कारवाई केलेली आहे. तसेच, ह्या प्रकरणी मुंबईच्या दिशेने विक्रीसाठी जात असलेल्या ह्या ट्रकच्या चालकाच्या विरोधातही चांदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.(Nashik Crime)

political News | ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी निवडणुकीचं मैदान मारणार?


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!