Skip to content

Crime News | ….अन् चार मुलांचा बाप, पाच मुलांची आई असलेल्या मेहुणीला घेऊन फरार

Crime News

Crime News |  सध्याच्या काळात आपण अतिरिक्त वैवाहिक संबंधांच्या अनेक घटना सर्रास ऐकत असतो. यातून अनेक जण आपले सुखी संसार सोडून दुसऱ्या व्यक्ती सोबत पळू जातात. मात्र, ही घटना ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. दरम्यान, या घटनेत एका व्यक्तीने पत्नी व ४ मुलांना सोडून चक्क आपल्या आधीच ५ मुलं असलेल्या पत्नीच्या बहिणीसोबत म्हणजेच सख्ख्या मेहुणीसोबतच पळाला आहे. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच दोघांच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेत, याबाबत तक्रार दाखल केली आहे.(Crime News)

ही घटना हरियाणाच्या कर्नाल येथे घडली असून, या घटनेमुळे अनेकजण हैराण झाले आहेत. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या प्रकरणातील पुरुषाचे नाव सलीम असून, हा मूळचा उत्तर प्रदेश राज्यातील फारुखाबाद येथील रहिवासी आहे. सलीम हा त्याची मेहुणी असल्याचे सांगत आपल्या भावाच्या पत्नीसोबतच पळून गेला आहे. दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला कारण, त्याच्या मेहुणीला ५ मुलं आहेत. तर, आरोपी स्वतः ४ मुलांचा बाप आहे. आणि विशेष म्हणजे, स्वतःच्या मेहुणीला घेऊन पसार झालेल्या आरोपीची पत्नी ही पाचव्यांदा गरोदर आहे. (Crime News)

Crime News | माझ्याशी लग्न कर नाहीतर…; तरुणीसोबत केले धक्कादायक कृत्य

पत्नीची काळजी घेण्यासाठी मेहुणीला आणले…

समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीची पत्नी ही पाचव्यांदा गरोदर होती. त्यामुळे हा आरोपी त्याच्या मेहुणीला आपल्या पत्नीला सांभाळण्यासाठी तसेच तिची काळजी घेण्यासाठी त्याच्या घरी घेऊन आला होता. त्यानंतर आता तो त्याच मेहुणीला घेऊन पसार झाला आहे. दरम्यान, मेहुणा आणि मेहुणी फरार झाले असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांना तब्बल पाच दिवसांनी कळाले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी स्थानिक पोलिसांत धाव घेत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Crime news | पत्नीवर संशय आला आणि जावयाने सासुरवाडीच संपवली

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, आरोपी हा उत्तर प्रदेशमधील आहे. कर्नालच्या घरोंडा येथील एका गावात हा आरोपी आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास होता. या आरोपीला चार मुलं असून त्याची पत्नी पाचव्यांदा गरोदर आहे. पत्नीची काळजी घेण्यासाठी आरोपी हा आपल्या मेहुणीला आणायला तिच्या घरी गेला असता, तिने बहिणीकडे जाण्यासाठी विरोध दर्शविला. मात्र कुटुंबीयांनी तिला जबरदस्तीने आरोपीसोबत तिच्या बहिणीची काळजी घेण्यासाठी पाठवले. या दोघांचे बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध होते. मात्र, याबाबत कोणालाही कल्पना नव्हती. (Crime News)

Crime News | पोलिसांकडून दोघांचा तपास सुरू 

या दोघांना फरार होऊन आता तब्बल ६ ते ७ दिवस झाले असून, अद्यापही आरोपी आणि महिलेबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिसांसोबत दोघांचे कुटुंबीयही त्यांचा शोध घेत आहेत. लवकरच दोघांना पकडू, असा दावा पोलिसांकडून केला जात आहे. (Crime News)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!