PM Modi in Nashik | मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, देवळ्यातील आंदोलक ताब्यात

0
22
PM Modi in Nashik
PM Modi in Nashik

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये येणार असून, यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने मोठी तयारी केली आहे. नाशिक पोलिसांनी आधीच नाशिक शहरात पुढील १५ दिवस मनाई आदेश लागू केलेले आहेत. नाशिकमध्ये आधीच पेटलेला कांदा निर्यात बंदीचा मुद्दा तसेच मराठा, ओबीसी, आणि धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा हा पेटलेला आहे. हे सर बघता आता नाशिक पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार सामाजिक कामासाठी आंदोलने करणा-यांना पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले आहे.

PM Modi in Nashik | नाशकात ‘मोदी उत्सव’; यामुळे नाशिकच्या विकासाचा वनवास संपणार?

जिल्ह्यात सामाजिक कामासाठी आंदोलने करणा-या सामाजिक संघटनांच्या नेत्यांना जिल्हा ग्रामीण पोलिस प्रशासनाने त्यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतले असून या आंदोलकांना पोलीस ठाण्यातच स्थानबद्ध केलेले आहे.अटकेची कुणकुण आम्हाला आधीच होती. कांदा  निर्यात बंदी उठली पाहिजे. तसेच कांद्याला आणि त्यासोबतच शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे. मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे अशा घोषणा देत या पदाधिकाऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला.(PM Modi in Nashik)

ताब्यात घेण्यात आलेल्या या आंदोलकांमध्ये प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष – कृष्णा जाधव, संजय दहिवडकर – अध्यक्ष ग्रामविकास समिती दहिवड, आकाश थोरात – तालुकाध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन संघटन देवळा, दत्ता पवार- तालुकाप्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जाणता राजा मंडळाचे अध्यक्ष – नंदन देवरे, सुभाष पवार – प्रहार आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे. (PM Modi in Nashik)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here