PM Modi in Nashik | आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये दाखल होत आहेत. २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात युवकांना संबोधित करण्यासाठी ते आज कुंभणगरीत दाखल होणार आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्राशसनाने जय्यत तयारी केलेली आहे. नाशिक शहरात ठिकठिकाणी रंगरंगोटी करण्यत आलेली असून, रामकुंडावर दिव्यांची आरास करण्यात आली आहे. एकुण आज नाशिकमध्ये ‘मोदी उत्सव’ असणार आहे. तब्बल पांच वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक नगरीत दाखल होणार आहे. यामुळे नाशिकला आता अनन्य साधरण महत्त्व प्राप्त झाले आहे. (PM Modi in Nashik)
मोदिंच्या या दौऱ्याला अनेक वेगवेगळे वळण दिले जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी तर, अशा आणखी अनेक चर्चा सुरू आहेत. मात्र, मोदींच्या येण्याने नाशिककर फार सुखावले आहेत. कारण मोदी येणार म्हणून नाशिक शरतील सगळी प्रलंबित कामे ही रातोरात मार्गी लागली आहेत. शहरात प्रमुख ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे.
PM Modi | शिंदे गटाचे आमदार म्हणे, मोदी पुन्हा पंतप्रधान न झाल्यास फाशी घेईन
मोदींच्या आगमनामुळे आता नाशिक मोदीमय झाले आहे. आज दुपारी १२.३० वाजता मोदी मैदानात त्यांची सभा होणार असून, त्यापूर्वी रोड शो देखील होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डझनभर केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळातील मंत्री नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. भाजप नेत्यांनी मोदींच्या स्वागतासाठी वातावरण निर्मिती चोख केली असून, या दौऱ्याद्वारे भाजप आणि शिंदे गटाने शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे.(PM Modi in Nashik)
PM Modi in Nashik |असा आहे मोदींचा नाशिक दौरा
१. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ११.३० वाजता ‘रोड शो’
२. काळाराम मंदिर येथे दर्शनाच्या माध्यमातून प्रत्यक्षपणे भजपच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.
३. यावेळी ते गोदा काठाची पाहणी करणार आहेत.
४. युवा केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने नाशिकमध्ये आयोजित ‘२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे‘ उदघाटन आणि सभेला संबोधित करणार आहेत. (PM Modi in Nashik)
PM Modi | मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गांत ‘मोठे’ बदल
मोदिंकडून नाशिककरांना आशा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम