राम मंदिरपाडून बांधायची होती मशीद ते मुस्लीम राष्ट्र ! पीएफआयचे हे होते मोठे धक्कादायक कट !

0
2

नाशिक : दहशतवादी विरोधी पथकाने अटक केलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पाच संशयितांकडून अनेक खळबळजनक माहिती समोर आली असून या संघटनेशी संबंधित अनेक खुलासे आता समोर आली आहेत.

२२ सप्टेंबर २०२२ रोजी एटीएसने राज्यभर छापे मारुन पीएफआयशी संबंधित संशयितांना ताब्यात घेतले होते. यामध्ये मालेगाव येथून एक, कोल्हापूर येथून एक, पुण्यातून दोन आणि बीडमधून एकाला ताब्यात घेतले. काल सोमवारी पीएफआयच्या या सर्व संशयितांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजार करण्यात आले. त्यावेळी झालेल्या सुनावणीदरम्यान अनेक खळबळजनक माहिती समोर आलेली आहे. ज्यात संघटनेकडून अयोध्येचे राम मंदिर पाडून तिथे पुन्हा बाबरी मशीद उभी करणे, तसेच २०४७ पर्यंत देशाला मुस्लीम राष्ट्र करण्याचे व अनेक विघातक कार्यवाही करण्याचे यांचे प्लॅन असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील पुरावे हे तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत.

तसेच, या पाच संशयितांनी विदेश दौरेदेखील केले असून त्यांच्या खात्यावर परदेशातून मोठ्या प्रमाणात पैसे देखील जमा झालेले आहेत. या सर्वांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला असून या ग्रुपचा अॅडमीन पाकिस्तानमधील असल्याची माहिती तपासात समोर आलेली असून तशी माहिती काल सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात दिली आहे. दरम्यान, या सुनावणीत सरकारी वकिलांनी या पाच जणांकडून हार्ड डिस्क, मोबाईल व अन्य कागदपत्रे जप्त केली असून न्यायालयाने या सर्व संशयितांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच एटीएसने अधिक तपासासाठी चार दिवसांची पोलिस कोठडीही राखून ठेवली आहे. या सर्वांची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

या प्रकरणी एनआयएने राज्यातील मालेगाव, पुणे, कोल्हापूर, बीड, नांदेड, औरंगाबाद, नगर, संगमनेर, मिरज, ठाणे याबरोबरच उत्तर प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, गुजरात, आसाम आणि मध्य प्रदेश या राज्यांत दिवसभर छापे घातले. तसेच पोलिसांनी एनआयएसह छापे टाकून ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांची धरपकड केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने पीएफआयवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here