Skip to content

maharashtra politics| शिंदे गटाच्या बड्या नेत्यालाच मंत्रालयाच्या गेटवर नो एन्ट्री; नेमकं प्रकरण काय?


maharashtra politics|  राज्यात सत्ता असूनही शिंदे गटाच्या सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या बड्या आमदारालाच मंत्रालयाच्या गेटवर नो एन्ट्री.

राज्यात महायुती सरकार असलं तरीही आता शिंदे गटामधीलच आमदारांना काही वाईट अनुभव घ्यावे लागत आहे. एका आमदाराला काल चक्क मंत्रालयाच्या मुख्य गेटवरून जाण्यास मनाई करण्यात आली. आणि त्यामुळे शिंदे गटाचा हे आमदार चांगलेच भडकले होते. आणि याचमुळे मंत्रालयात एकच गदारोळ निर्माण झाला होता.

शिवसेनेत फुट पडल्यानंतर राज्यात नवीन राजकीय समीकरण उदयास आलं. शिंदे गटाने भाजपशी जुळवून घेत राज्यात सत्ता पालटवली. शिंदे गटाला मुख्यमंत्रीपदही दिले गेले. त्यामुळे अनेक आमदारांच्या मंत्रीपद मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. आता आपलंच सरकार आहे, त्यामुळे आता कसलीच चिंता नाही. लोकांची आणि आपलीही कामे झटपट मार्गी लागतील. कुठेही आपल्याला कोणी अडवू शकणार नाही. असं शिंदे गटातील अनेक जणांना वाटत होतं. पण, आता मात्र एक घटनेमुळे अनेकांचा चांगलाच अपेक्षाभंग झाला आहे. याचे कारण म्हणजे शिंदे गटाच्याच एका आमदाराला एक कटू अनुभव आला असून, ह्या आमदाराला चक्क मंत्रालयाच्या मुख्य गेटवरच प्रवेश नाकारला गेल्याने सर्वच स्तरावरून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

शिंदे गटाचे सर्वाधिक चर्चेतील आमदार संजय शिरसाट यांना हा अनुभव आला आहे. आणि त्यामुळेच त्यांची मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांशीही चांगलीच बाचाबाची झाली आहे. पण पोलिसांनी कोणालाही ताकास तूर लागू दिला नाही. पण यामुळे आमदार शिरसाट मात्र कमालीचे अस्वस्थ झाले होते. शेवटी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांनी स्वतः मध्यस्थी करत हा वाद मिटवला.  पण आपलंच सरकार सर्वकाही आपलंच असतानाही अशी वागणूक मिळाल्याने संजय शिरसाट मात्र कमालीचे नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

OnePlus Open फोल्डेबल फोन भारतात लाँच; सॅमसंगला टक्कर

नेमकं प्रकरण काय?

काल मंत्रिमंडळाची बैठक होती. या बैठकीमुळे मंत्रालय परिसरात चांगलीच गर्दी जमली होती. दुपारी दोनच्या सुमारास आमदार संजय शिरसाट हे स्वत:च्या गाडीने मंत्रालयाच्या ‘जनता जनार्दन’ म्हणजेच मुख्य प्रवेशद्वारावर पोहचले. मात्र, पोलिसांनी चक्क त्यांची गाडी अडवली.आणि “तुम्हाला येथून जाता येणार नाही, तुम्ही गार्डन गेटने जा” असं पोलिसांनी शिरसाट यांना सांगितले. त्यावर शिरसाट मात्र चांगलेच भडकले. त्यांच्या संतापाचा पारा चढला. आणि त्यांनी “मी आमदार आहे. तुम्ही मला ओळखत नाही का? हा नियम कोणी केला? गेली १५ वर्षे मी येथूनच ये – जा करतो. तेव्हा तर कधी मला अडवलं गेलं नाही. आताच का अडवताय?’ असा सवाल शिरसाट यांनी केला. आणि याच मुख्य प्रवेशदाराने मी जाईल असा हट्टच त्यांनी धरला होता.

शेवटी दादांनी केली मध्यस्थी… 

यावेळी आमदार संजय शिरसाठ आणि पोलिस यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. पोलीस आमदार शिरसाठ यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. पण शिरसाठ काही ऐकतच नव्हते. मंत्रालयाच्या सुरक्षेचे नियम बदलण्यात आले असून, मुख्य प्रवेशद्वाराने केवळ मंत्र्यांच्याच वाहनांना परवानगी देण्यात आली असून, आमदार आणि इतरांच्या वाहनांना गार्डन गेटने प्रवेश आहे आणि आरसा गेटने बाहेर पडता येणार आहे असा नियम केला आहे, असं पोलिसांनी शिरसाठ यांना सांगितलं.

पण शिरसाट काही ऐकायलाच तयार नव्हते. पोलीस आणि शिरसाट यांच्यातील वाद सुरू असल्यामुळे मुख्य गेटवर एकच गर्दी झाली. त्यानंतर मंत्री दादा भुसे यांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. पण, शिरसाठ मात्र यामुळे चांगलेच नाराज असल्याचे दिसत होते.

Nashik News| ललित पाटीलकडून ‘मातोश्री’ वर हप्ते जात होते का? ; देवयाणी फरांदेंचे घणाघाती आरोप…


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!